Shirdi News : थोरातांनी गती दिली, विखेंची कुरघोडी अन् लोखंडेंनी निळवंडेचं श्रेय दिलं CM शिंदेंना; पण...

Shirdi Loksabha Election 2024 : निळवंडे धरणाच्या कामाचं श्रेय महाविकास आघाडी अन् महायुतीत नेत घेताना दिसतात, मात्र...
sadashiv lokhande Eknath Shinde Nilwande Dam
sadashiv lokhande Eknath Shinde Nilwande DamSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : शिर्डीची लोकसभा निवडणूक ही निळवंडे धरण आणि त्याच्या उजव्या, डाव्या कालव्याभोवती होणार, हे जवळपास निश्चित झालं आहे. निळवंडे धरणाचं श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय धुरींमध्ये चढाओढ दिसते. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) यांनी निळवंडेचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. यामुळे खासदार लोखंडेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या श्रेयाची भूमिका त्यांच्या लोकसभेची वाटचाल सुकर करते की, खडतर करते यावर सध्या राजकीय चर्चा सुरू आहेत.

sadashiv lokhande Eknath Shinde Nilwande Dam
Mood Of Nation : योगी आदित्यनाथ देशातील सर्वात लोकप्रिय CM, एकनाथ शिंदे कोणत्या क्रमांकावर?

निळवंडे धरण, त्याच्या उजव्या आणि डाव्या कालव्याचे काम झाले. निळवंडेच्या कामाच्या श्रेय महाविकास आघाडी आणि भाजप ( Bjp ) महायुती सरकारमध्ये नगरमधून सहभागी झालेले दोन्हीकडचे लोकप्रतिनिधी घेताना दिसत आहेत. यात कुरघोडी केली आहे ती, महसूल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर भाजप महायुतीचे सरकार आले. निळवंडे धरणाच्या उद्घाटनासाठी मंत्री विखेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिर्डीत आणलं. या वेळी मंत्री विखे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री असताना निळवंडेच्या कामाला खरी गती दिली. यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांची साथ मिळाली. या कामाची पावती तत्कालीन मंत्री तथा ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी दिली. जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या काळातच निळवंडेचे 90 टक्के काम थोरात आणि तनपुरे यांनी लावल्याची कबुली दिली. निळवंडेच्या उजव्या आणि डाव्या कालवातून जसे गावागावांना पाणी पोहोचत आहे, तसे जलपूजनाचे कार्यक्रम थोरात आणि विखे यांच्या गटाकडून होत आहेत. यातून एकमेकांवर निशाणा साधण्यात येत आहे.

sadashiv lokhande Eknath Shinde Nilwande Dam
Loksabha Election 2024 : शिर्डीत रंगणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना, उद्धव ठाकरेंनी ठोकला शड्डू तर...

आमदार थोरात यांना या कामामुळे जलनायक म्हटले जात आहे, तर मंत्री विखेंकडून यावर टिप्पणी केली जात आहे. अशातच लोकसभा निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे सध्या तरी एकटेच मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपडत आहेत. महायुतीत असले तरी खासदार लोखंडे यांची सर्व मदार ही मुख्यमंत्री शिंदेंवर अवलंबून आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवस झाला. खासदार लोखंडेंनी मुख्यमंत्री शिंदेंसाठी साईबाबा चरणी येथे पाद्यपूजा केली. या वेळी खासदार लोखंडेंनी निळवंडे धरणाच्या कामाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री शिंदेंना देऊन टाकले.

sadashiv lokhande Eknath Shinde Nilwande Dam
Abhishek Ghosalkar Case : गँगवॉरवर गोंधळ घालणारे साधूंची हत्या झाली तेव्हा कुठे होते ? सामंतांचा ठाकरेंवर 'बाण'

खासदार लोखंडे म्हणाले, "शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला दोन वेळा खासदार केले. त्यामुळे ५० वर्षे रेंगाळलेल्या निळवंडे धरणाऱ्या कामाला गती देता आली. पुढील वर्षात कालव्यांद्वारे शेतात पाणी येईल. मुख्यमंत्री शिंदेंनी शक्ती दिल्याने हे काम गतीने मार्गी लावता आले."

sadashiv lokhande Eknath Shinde Nilwande Dam
Ajit Pawar Kolhapur News: 'कुणीही मोठ्या बापाचा असला, तरी त्याला पाठीशी घालणार नाही'; अजित पवारांचा गुंडांना सज्जड दम

आता त्यांच्याच शक्तीमुळे पश्चिम घाटमाथ्यावरील पावसाचे 115 टीएमसी पाणी पूर्वेकडे वळवून नगरसह मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची योजना महायुती सरकारने हाती घेतल्याचीदेखील माहिती खासदार लोखंडे यांनी दिली.

sadashiv lokhande Eknath Shinde Nilwande Dam
Pandharpur-Mangalvedha Politics : परिचारकांनी मनातील गोष्ट बोलून दाखवली; ‘आवताडेंना मी आमदार केलं, पक्षासाठी मी दोनदा माघार घेतली’

खासदार लोखंडे यांनी निळवंडेचे श्रेय मुख्यमंत्री शिंदेंना दिल्याने त्यांचा लोकसभेचा मार्ग सुकर झाला की, खडतर हे आगामी काळात कळेल. खासदार लोखंडेंच्या या भूमिकेमुळे महायुती सरकारमध्ये असलेले विखे पिता-पुत्रांनी भुवया उंचवल्या नसतील, तर नवलच आहे.

R

sadashiv lokhande Eknath Shinde Nilwande Dam
Lok Sabha Election 2024 : ‘वंचित’मधील प्रवेशाने ‘ते’ मनोज जरांगे पाटील ‘प्रकाश’झोतात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com