Sanjay Raut News : 'एकनाथ शिंदेंवर गणपत गायकवाडांनी केलेल्या 'त्या' गंभीर आरोपाची चौकशी होणार का?'

Ganpat Gaikwad against Eknath Shinde : संजय राऊतांचा डोंबिवलीतील भरसभेतून थेट सवाल
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Dombivali News : ' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधी रुपये घेतले आहेत. असा गंभीर आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जर खरोखर कायद्याचे राज्य असेल, तर मग त्या पैशांचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. हे पैसे कुठून आले, कुठे ठेवले आहेत याची माहिती मिळाली पाहिजे.' असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

याचबरोबर 'माझ्या माहितीप्रमाणे ही रक्कम 150 कोटींपेक्षा जास्त आहे. कारण एकनाथ शिंदे लाखात बोलत नाहीत. किमान 50 खोके कुठेच नाहीत. असे संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केला. ते शनिवारी सायंकाळी डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाच्या शाखांच्या उद्घाटनासाठी आले होते . यावेळी त्यांनी डोंबिवलीत घेतलेल्या सभेत बोलताना हा उल्लेख केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut
Ganpat Gaikwad Case : गोळीबार प्रकरणात BJP आमदाराला पोलिस कोठडी; गायकवाडांचे थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप

20 दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी काही शाखांचे उद्घाटन कल्याण-डोंबिवली येथे केले होते. त्यानंतर डोंबिवलीत आणखी तीन शाखांचे उद्घाटन करण्यासाठी खासदार संजय राऊत डोंबिवलीत आले होते. ठाकरे गटाकडून घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक त्यांच्या हस्ते देण्यात आले आणि याच ठिकाणी त्यांची सभा देखील पार पडली.

या सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची(Eknath Shinde) पण चौकशी करा अशी मागणी केली. तसेच प्रत्येक शाखेच्या उद्घाटनाला जो प्रतिसाद जनतेचा होता. शिवसैनिकांचा होता ते पाहून मी एवढच म्हणालो होतो की, आपली शिवसेना जमिनीवर आहे तर बाकीच्यांची फलकांवर आहे. डोंबिवलीत प्रचंड फलक लावण्यात आले आहेत. बाळ राजांचा वाढदिवसाचे फलक दोन दिवस आधीपासूनच लावले आहेत. त्यांनतर आता खरे फटाके फुटणार आहेत असे त्यांनी सांगितले. बाळ राजांचा वाढदिवस उद्या आहे आणि काल पोलीस स्टेशनला फटाके फुटले. आता हे फटाके पोलीस ठाण्यात फुटले असले तरी तुमच्या खुर्ची खाली फुटले आहेत ते लक्षात घ्या. अशा शब्दात शिंदे सरकारवर राऊतांनी टीका केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Sanjay Raut
MP Shrikant Shinde : ...अन् श्रीकांत शिंदेंचे डोळे अश्रूंनी डबडबले !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com