MP Shrikant Shinde : ...अन् श्रीकांत शिंदेंचे डोळे अश्रूंनी डबडबले !

MLA Ganpat Gaikwad : ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महेश गायकवाडांची भेट घेतल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे झाले भावूक
Mahesh Gaikwad, Shrikant Shinde
Mahesh Gaikwad, Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thane Crime News :

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी काल (2 फेब्रुवारी) रात्री महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. यात गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हॉस्पिटलने सकाळी काढलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी हॉस्पिटरमध्ये जाऊन विचारपूस केली.

Mahesh Gaikwad, Shrikant Shinde
Ganpat Gaikwad Firing : पोलिसांनी गोळीबार प्रकरणाची माहिती विधानभवनाला दिली; कारवाई होणार ?

आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) हे कल्याण पूर्वचे शिवसेना (Shivsena) शहरप्रमुख आहेत. कल्याण लोकसभा हा श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. शिवाय महेश गायकवाड हे त्यांचे निकटवर्तीय मानले जात असल्यामुळे श्रीकांत शिंदे आवर्जून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला हॉस्पिटलमध्ये आले होते. पण त्यानंतर त्यांचे पाणावले होते. नेहमी हसमुख दिसणारे श्रीकांत शिंदे खूप गंभीर दिसत होते.

महेश गायकवाड यांनी कल्याणमध्ये कोविडकाळात खूप चांगले काम केले. त्यामुळे त्यांची डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी जवळीक झाली ती कायमचीच. आतात तर महेश गायकवाड यांच्याकडे आमदारकीचा उमेदवार म्हणून पाहिले जात होते.

जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर सहा राऊंड फायर केले. यात ते जबर जखमी झाले. त्यांना रात्रीच ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवाय रात्रीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. यावेळी महेश गायकवाड याच्यासोबत त्यांचे जखमी सहकारी राहुल पाटील देखील होते. राहुल यांचीच प्रकृती स्थिर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महेश गायकवाड यांना शुक्रवारी रात्री ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर काही वेळातच खासदार श्रीकांत शिंदे हॉस्पिटसमध्ये पोहोचले होते. महेश यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते घरी गेले होते. त्यानंतर आज दुपारी पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले होते.

दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार शिंदे यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटीर यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडे विचारपूस केली. शिवाय दोघांवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. पाऊण तासाने दोघेही हॉस्पिटलमधून बाहेर पडले. त्यानंतर खासदार शिंदे प्रसारमाध्यमांशी न बोलता गाडीत जाऊन बसले. मात्र काही क्षणात ते गाडीतून बाहेर आल्यावर ते प्रसारमाध्यमांशी सामोरे गेले. यावेळी ते खूप गंभीर होते. डोळे अश्रूंनी डबडबले होते. आपला सोबती मृत्यूशी झंज देत असल्याचा तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

(Edited by Avinash Chandane)

Mahesh Gaikwad, Shrikant Shinde
Ganpat Gaikwad Firing : ज्या वादातून महेश गायकवाडांवर हल्ला, ते तक्रारदारच समोर; केली 'ही' मोठी मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com