Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Sanjay Raut Vs Eknath Shinde : 'पानीपत'चा इतिहास सांगत राऊतांचा CM शिंदेंवर हल्लाबोल; म्हणाले, तोतयांचं सरकार...

Thane Politics : लाडक्या बहिणीची किंमत फक्त दीड हजार. आमदारांना 50 कोटी, मतदारांना विकत घेण्यासाठी 10 हजार दिले जातात.
Published on

Maharashtra Political News : लबाडी केल्याशिवाय हे जिंकूच शकत नाही. ठाण्यासह राज्यातही त्यांनी लबाडी केली. असे तोतये आमच्यावर सोडले तर त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही. राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. तोतयांचे सरकार आहे, असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता हल्लाबोल करत खासदार संजय राऊत यांनी पानीपतचा इतिहासच सांगितला. ते ठाण्यातील भगवा सप्ताहाच्या कार्यक्रमात बोलत होते.

पानीपतच्या लढाईतील काही तोतयांची पाळेमुळे ठाण्यातही असल्याचा दाखला राऊतांनी देत शिंदे गटावर Eknath Shinde निशाणा साधला. ते म्हणाले, पानीपतच्या युद्धात हत्तीवरून लढणाऱ्या सदाशिवराव भाऊ या मोठ्या योद्ध्याला विरगती प्राप्त झाली. तेथे अहमद शाह आब्दाली होता. त्यानंतर एक बनावट सदाशिवराव भाऊ पुण्यात आवतारला. तो म्हणू लागला की मीच सदाशिवराव भाऊ आहे.

त्यावेळी खूप मोठी चौकशी झाली. त्यावेळी तो तोतया असल्याचे स्पष्ट झाले. त्याचे नाव सुखलाल होते. त्याच्याबरोबर 10 लोक होते. त्यात एक शिंदे होते. त्याचे पालघरमध्ये नेटवर्क होते. तर सुखलाल हा सुरतचा होता. त्यानुसार असे बनावट लोक तयार करून महाराष्ट्र ताब्यात घ्यायचे पूर्वीपासून अनेक प्रयत्न झाले. महाराष्ट्राने मात्र असे प्रत्येक डाव उधळून लावले आहेत, असे सांगत राऊतांनी Sanjay Raut राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा केला.

Sanjay Raut
Sanjay Raut : संजय राऊतांनी केली 'पिक्चर'ची घोषणा! नावही सांगितलं...

लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात लबाडी झाली. त्यामुळे विधानसभेत सावध राहण्याचे आवाहनही राऊतांनी केले. आता त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे. मात्र मोदींच्या लाडक्या गद्दारांना खुर्चीच लाडकी आहे. लाडक्या बहिणीची किंमत फक्त दीड हजार. आमदारांना 50 कोटी, मतदारांना विकत घेण्यासाठी 10 हजार दिले जातात. निष्ठावान बहि‍णींच्या घरावर मात्र बुलडोजर फिरवला गेला. हा गुजरात पॅटर्न आहे. हा राज्यात चालणार नाही, असेही राऊतांनी ठणकावून सांगितले.

Sanjay Raut
Sanjay Raut : उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचा चेहरा; संजय राऊतांच्या घोषणेने आघाडीत बिघाडी होणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com