Sanjay Raut : संजय राऊतांनी केली 'पिक्चर'ची घोषणा! नावही सांगितलं...

Eknath Shinde And Dharmaveer Cinema : ठाण्याची ओळख कडवट निष्ठावान अशी होती. ठाणे निष्ठावान असलेल्या आनंद दिघे यांच्या नावाने ओळखले जात होते. आता या नमक हारामांनी ते मातीत मिळवले आहे.
Ranjay Raut
Ranjay RautSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : दोन वर्षांपूर्वी धर्मवीर चित्रपट रिलिज झाला होता. त्यानंतर त्याचा सिक्वल येत आहे. हे मुख्यमंत्री आहेत की फिल्म प्रोड्यूसर? आता मीही एक सिनेमा काढणार आहे. त्याचे नाव 'नमक हराम 2.'

त्याची स्क्रिप्ट तयार असून त्यात ठाण्यातील सगळ्या हारामखोरांवर प्रकाश टाकणार आहे, असा ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते, खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपापले कार्यक्रम राबवण्याचा धडाकाच लावलेला दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना ठाकरे गटाचा भगवा सप्ताह सुरू आहे. ठाण्यातील कार्यक्रमात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांना लक्ष्य केले.

संजय राऊत Sanjay Raut म्हणाले, येथील गब्बरांनी ठाण्याचे नाव पूर्णपणे मातीत मिळवले आहे. ठाण्याची ओळख कडवट निष्ठावान अशी होती. ठाणे निष्ठावान असलेल्या आनंद दिघे यांच्या नावाने ओळखले जात होते. आता या नमक हारामांनी ते मातीत मिळवले आहे, अशा शब्दात राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे आणि इतर नेत्यांचा समाचार घेतला.

Ranjay Raut
Sanjay Raut : उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचा चेहरा; संजय राऊतांच्या घोषणेने आघाडीत बिघाडी होणार?

ठाण्यात हा भगवा सप्ताहाचा कार्यक्रमात नागपंचमीच्या दिवशीच व्हायला हवा होता, असे म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना Eknath Shinde घेरले. ते म्हणाले, शिवसेना ही भगव्याची रखवालदार आहे, त्यामुळेच हा भगाव सप्ताह सुरू आहे. त्यांचा मात्र आम्हाला जगवा सप्ताह सुरू आहे.

दिल्लीत जातात आणि म्हणतात आम्हाला जगवा. ज्या सापांना शिवसेनेने दूध पाजले ते सोडून गेले. लोकसभेत त्या सापांच्या शेपट्या वळवळत राहिल्या. आता विधानसभेत आम्ही त्यांचे फणे ठेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राऊतांनी शिंदे गटाला दिला आहे.

Ranjay Raut
Uddhav Thackeray News : '..तर मिंधेंची दाढी उगवलीच नसती' ; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातूनच एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com