Sanjay Raut Vs Devendra Fadnavis : कायदा-सुव्यवस्था कशी माती खाते; संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावलं

Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis : शिवसेनेचे संजय राऊत यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis
Sanjay Raut Vs Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक यांच्यावर कोयता गँगमधील दोघांनी केलेल्या हल्ल्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

"गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कायदा आणि सुव्यवस्था कशी माती खाते आहे, हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्ला आहे, त्यांनी राजीनामा द्यावा, त्यांचे पोलिस सुरक्षित नाहीत आणि ते आम्हाला सांगतात की ते आमच्या बहिणीचं रक्षण करतील", असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

पुण्यातील (Pune) या घटनेनंतर शिवसेनेचे संजय राऊत यांनी पु्ण्यात वाढलेल्या गुन्हेगारी विश्वाचं सर्वच काढत, देवेंद्र फडणवीस यांना चांगलच सुनावलं. पुण्यात सर्वात जास्त अमली पदार्थाचा व्यवहार होतो, असा आरोप करत ललित पाटील प्रकरणातील सूत्रधार कोण आहे हे आपण पाहिलेला आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. पोलिस यंत्रणा कशी विकली गेली, हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत नाही का? पुण्याचे पालकमंत्री नेमके काय करत आहेत, जे गुलाबी कपड्यात फिरत आहेत, असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis
Attacks On Police : कोयता गँग आता पोलिसांच्याही जीवावर, एपीआयवर हल्ला

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जळगाव इथं झालेल्या लखपती दीदी संमेलनातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणाचा संदर्भ घेत, टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांना न्याय मिळविण्यासंदर्भात भाषण ठोकून गेले, पण महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये दोन असे मंत्री बसलेत की, त्यांच्याविरुद्ध अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. त्यांची चौकशी लावा. एका मंत्र्यामुळे युवतीने आत्महत्या केली आहे. त्यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. पण आता तेच महायुती सरकारमध्ये मंत्री होऊ बसले आहेत, याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली.

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis
Pune MPSC Protest : MPSC परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचे भाजप आमदाराला संतापजनक पत्र...

महायुती सरकार आल्यापासून महिलांच्या अत्याचारात वाढ झाली आहे. बदलापुरची घटनेनंतर महाराष्ट्रात 27 ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. याबाबत प्रश्न विचारल्यास ते लोक बनावट प्रकरण तयार करतात, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला.

भाजपमध्ये आंदोलन करणारे त्यांचे कार्यकर्ते नाहीत, तर पगारी वर्कर आहेत. ठाकरे कुटुंब महाराष्ट्रातील लोकप्रिय कुटुंब आहे. महाराष्ट्रातील लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे. यातून तुमचेच मुखवटे गळून पडतील, ठाकरे कुटुंबावर, असे आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकणे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com