Attacks On Police : कोयता गँग आता पोलिसांच्याही जीवावर, एपीआयवर हल्ला

Koyta Gang Attack Police : पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता गँगच्या गुंडांना पकडण्यासाठी गेलेला सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर गुंडांनी कोयत्याने हल्ला केला.
Koyta Gang Attack Police
Koyta Gang Attack Policesarkarnama
Published on
Updated on

Pune News : कोयता गँगला आता पोलिसांचीही दहशत राहिला नाही की काय, असा प्रश्न निर्माण होतो आहे. कोयता गँगच्या टोळीने सहाय्यक पोलिस निरीक्षकावर हल्ला केला. या हल्ल्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक जखमी झाला आहे. रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सहाय्यक पोलिस गायकवाड यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

गेल्या काही काळापासून पुणे शहराच्या विविध भागांमध्ये कोयता गॅंगचा वावर वाढला आहे. कोयता घेऊन फिरणे, दहशत माजवून नागरिकांना धमकवणे,खूनी हल्ला करणे या प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे या कोयता गँगच्या माध्यमातून सातत्याने होत असताना पाहायला मिळत आहेत.

Koyta Gang Attack Police
Aditya Thackeray : केंद्रातील भाजप सरकारच्या 'फायनान्स मॉडेल'वर आदित्य ठाकरेंचे फटकारे

पुणे शहरातील या कोयता गॅंगचा नायनाट करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांनी पोलिसांना दिल्या आहेत. पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी या कोयतागँगचा नायनाट करण्यासाठी कठोरातील कठोर पाऊल उचला, असे पोलिसांना सांगितला आहे. त्यानुसार पोलिसांकडून सातत्याने या कोयता गँगवर कारवाई करण्यात येत आहेत.

असे असले तरी प्रत्येक महिन्यामध्ये कोयता गॅंगचा एक तरी गुन्हा समोर येत आहेत. आतापर्यंत सामान्य नागरिकांना धमकावणाऱ्या, हल्ला करणाऱ्या कोयता गँगची पोलिसांवर हल्ला करण्या इतपत मजल गेली आहे.

सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला करून कोयता गँगच्या गुंडांनी जखमी केले. पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता गँगच्या गुंडांना पकडण्यासाठी गायकवाड गेले होते. मात्र, गुंडांनी गायकवाड यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले.

आरोपी फरार

रामवाडी परिसरात टोळक्याची भांडणं सुरू होती. पेट्रोलिंग करताना एपीआय रत्नदीप गायकवाड हे तेथे गेले. मात्र, निहाल सिंग टाक या आरोपीने रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला केला. निहाल सिंग टाक फरार आहे. त्याच्यासोबत राहुल सिंग हा देखील आरोपी होता. हे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या दोघांवर देखील आधीच पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

(Edited By Roshan More)

Koyta Gang Attack Police
Assembly Election : अयोध्येत विजय मिळवणारे अवधेश प्रसाद भाजपला पुन्हा धूळ चारणार; अखिलेश यांची रणनीती...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com