Ramdas Athawale News : 'शरद पवारांना भेटलो असतो तर एक तरी जागा मिळाली असती...' ; आठवलेंनी काढला चिमटा!

Lok Sabha Election 2024 : "मी प्रामाणिक माणूस आहे. मी ज्यांच्यासोबत आहे, त्यांच्यासोबत राहण्याची माझी भूमिका आहे."
Ramdas Athawale News
Ramdas Athawale NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी लोकसभेच्या समीकरणासाठी महाविकास आघाडीच्या भेटी घेतल्या होत्या. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेटही घेतली होती. जानकर आघाडीत सामील होणारच, अशा चर्चादेखील रंगल्या होत्या. मात्र, ऐनवेळी जानकरांनी कात्रजचा घाट दाखवत महायुतीसोबतच राजकीय घरोबा कायम ठेवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच चक्रे हलवून जानकरांना पुन्हा राजकीय मिठी मारली. यावरून आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी फडणवीस आणि जानकरांना राजकीय चिमटा काढला आहे. (Lok Sabha Election 2024)

Ramdas Athawale News
Lok Sabha Election 2024 : 'शिर्डीची एक जागा आम्हाला मिळायला हवी होती'; आठवलेंची जाहीर खंत!

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, तुम्हाला किंवा तुमच्या पक्षातील नेत्यांना का डावलले जात आहे? असा प्रश्न विचारल्यानंतर आठवले म्हणाले, "राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हुशार राजकारणी आहेत. महादेव जानकर हे महाआघाडीत जाऊ नये म्हणून आधीच त्यांना महायुतीत घेत परभणीची जागा त्यांना सोडण्यात आली. जानकर माझे मित्रच आहेत. ते महायुतीचा भाग आहेत. याचा आम्हाला आनंद आहे."

Ramdas Athawale News
Kolhapur NCP : 'बडा घर, पोकळ वासा!'; कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या स्थितीला जबाबदार कोण?

जानकरांनी घेतलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटी आणि त्यात विशेषतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीचा अप्रत्यक्ष उल्लेख करत भाष्य केले आहे. आठवले म्हणाले, "मी जर कदाचित शरद पवारांना (Sharad Pawar) भेटून आलो असतो, तर मला महाविकास आघाडीची एक जागा त्यांनी सोडली असती. पण मी काही तसा प्रयत्न केला नाही. कारण मी प्रामाणिक माणूस आहे. मी ज्यांच्यासोबत आहे, त्यांच्यासोबत राहण्याची माझी भूमिका आहे. त्यामुळे असे काही डावपेच केले नाहीत," अशा मिश्किली करत आठवलेंनी एकाच वेळी फडणवीस आणि जानकरांना राजकीय चिमटा काढला आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.