
Mallikarjun Kharge News : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेणार आहेत. सावरकरांच्या अवमानासंदर्भात खर्गेंशी चर्चा करणार असल्याचे राऊतांनी सांगितले. काँग्रेसच्या स्नेहभोजन पंगतीकडे शिवसेना ठाकरे गटाने पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीमध्ये काही धुसफूस सुरू आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे.
राहुल गांधी यांनी नुकतेच सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. माफी मागायला मी सावरकर आहे का? मी गांधी आहे. आणि गांधी कधी माफी मागत नाहीत, अशा आशयाचं विधान राहुल गांधी यांनी केले होते. यानंतर मालेगावच्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना इशारा दिला होता.
सावरकर हे आमचे दैवत आहेत. सावरकरांचा अवमान सहन करणार नाही, असा इशाराच ठाकरेंनी दिला. यावरूनच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपने केली होती. सावरकर मुद्द्यावरून तुम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडा, असे एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना सुनावले होते. यानंतर आता महाविकास आघाडीत धूसफुस असल्याचे बोलले जात होते.
सावरकर मुद्यावर महाविकास आघाडीत बिघाडी होणार, असे बोलले जात होते. आता यातच ताळमेळ साधण्यासाठी संजय राऊत आणि काँग्रेस अध्यक्ष यांची भेट होणार आहे. या भेटीत सावरकर अवामानावरून झालेल्य़ा वादावर चर्चा होणार असल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.