Sanjay raut On Advay Hiray Arrest : अद्वय हिरेंच्या अटकेनंतर राऊतांच्या निशाण्यावर सत्तेतले दोन नेते; म्हणाले...

Malegaon Political News : गिरणा 178 कोटी, भीमा पाटस 500 कोटींचा घोटाळा मात्र कारवाई झाली नाही..
Sanjay raut On Advay Hire
Sanjay raut On Advay Hire Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Latest News : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रेणुका सूतगिरणी संस्थेसाठी घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना भोपाळमधून अटक करण्यात आली. या प्रकरणी त्यांच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल झाला होता. ऐन दिवाळीत पोलिसांनी ही अटकेची कारवाई केल्याने आता ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. राजकीय दबावतंत्रातून त्यांना अटक झाली, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

Sanjay raut On Advay Hire
NCP Pandharpur: पंढरपूर मतदारसंघात राष्ट्रवादीपुढे पक्ष विस्ताराचे आव्हान; अभिजीत पाटलांचा लागणार कस

अद्वय हिरे यांच्या अटकेनंतर संजय राऊत म्हणाले, शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांची अटक हे राजकीय दबाव तंत्र आहे. नाशिक जिल्हा बँकेचे 7 कोटी रुपयांचे हे कर्ज प्रकरणात त्यांना अटक झाली. मात्र, गिरणा मौसम साखर कारखान्याचे 178 कोटींच्या अफरातफर प्रकरणात मंत्री दादा भुसे अडकले पण कारवाई नाही. भीमा पाटस साखर कारखाना दौंड येथे 500 कोटींचे मनी लाँड्रिंग प्रकरणात भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर कारवाई नाही, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

Sanjay raut On Advay Hire
Nanded BJP News : भाजप जम्बो कार्यकारिणीला `मिशन ४५ प्लस`चे आव्हान पेलावे लागणार...

राऊतम्हणाले, "मंत्रिमंडळात अनेक भ्रष्ट लोक जामिनावर आहेत. सहकारी बँकांचे अनेक थकबाकीदार सरकारात आहेत. मात्र, अद्वय हिरे यांनी मालेगावात सक्रिय राहू नये. मालेगाव विधानसभा निवडणूक लढू नये, यासाठी राजकीय दबाव होता. हिरे झुकले नाहीत. त्यांना अटक झाली. शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे लढत राहू आणि जिंकू," असे राऊत म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com