Sanjay Raut On EVM : बॅलेट पेपरवर मतदान झालं तर भाजपला 33 कोटी देव अन् प्रभू रामही.. ; राऊतांना EVM वर संंशय!

Sanjay Raut On EVM Ballot Paper : ...तर भाजपला ग्रामपंचाय-नगरपालिकाही जिंकता येणार नाहीत.
Sanjay Raut On EVM : बॅलेट पेपरवर मतदान झालं तर भाजपला 33 कोटी देव अन् प्रभू रामही.. ; राऊतांना EVM वर संंशय!
Published on
Updated on

Mumbai News : नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या होत्या, या पैकी तीन महत्त्वाच्या आणि मोठ्या राज्यांमध्ये भाजपने सत्ता मिळवली. तीनही राज्यात भाजपने नव्या मुख्यमंत्र्यांना संधी दिली. मात्र, निवडणूक प्रक्रियेबाबत विरोधकांच्या काही नेत्यांकडून मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या इव्हीएम मशीनबाबत संशय व्यक्त केला होता. मात्र आता खासदार संजय राऊत यांनी इव्हिएमबाबत संशय व्यक्त करत, बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचे आव्हान भाजपला दिले आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut On EVM : बॅलेट पेपरवर मतदान झालं तर भाजपला 33 कोटी देव अन् प्रभू रामही.. ; राऊतांना EVM वर संंशय!
NCP MLA Disqualification Timetable : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रसंदर्भातील वेळापत्रक जाहीर; कशी आहे प्रक्रिया?

संजय राऊत म्हणाले, "ईव्हीएमबाबात लोकांना संशय आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर हल्ला झाला.लोकांचा संताप उसळून येत आहे. उद्या ईव्हीएमच्याबाबतही जनता रस्त्यावर आली अन् अराजक माजलं, त्याला जबाबदार सरकारच राहील. ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वासच नाही, तर मग कोणती लोकशाही तुम्ही देशावर लागू करु इच्छिता."

तुम्हाला जर लोकांचा पाठींबा आहे, असे म्हणता. तर मतपत्रिकेवर निवडणूक घ्यायला का घाबरता? बॅलट पेपरवर निवडणुका झाल्या तर आपल्याला तेहतीस कोटी देव वाचवणार नाहीत आणि प्रभू श्रीरामही वाचवणार नाहीत. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर भाजपला ग्रामपंचाय-नगरपालिकाही जिंकता येणार नाहीत. या देशात मोदींचं राज्य नसून, इव्हिएमच्या माध्यमातून लादलेलं हुकूमशाहीच्या राज्य आहे, संजय राऊत म्हणाले.

(Edited BY - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com