Sanjay Raut News : महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात...! खासदार संजय राऊत यांचे स्पष्टीकरण...

Allotment of seat in Mahavikas Aghadi : अदानींची श्रीमंती हीच भाजपची श्रीमंती असल्याचा केला हल्लाबोल...
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत वाटाघाटी सुरू आहेत. यामध्ये मतभेद असल्याचे वारंवार बोलले जात आहे. मात्र, आज ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात आले असल्याचे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले आहे.

तर महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षात मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अदानींची श्रीमंती हीच भाजपची श्रीमंती असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी उद्योपती अदानी आणि भाजप (BJP) वर केला. राऊत म्हणाले, महाराष्ट्रामध्ये जागावाटपाबाबत फॉर्म्युला हा शब्द वापरणे चुकीचा आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे.

Sanjay Raut
MNS Pune News : एकाच महिन्यात मराठा समाज मागासलेपणाचा अहवाल कशाच्या आधारे? मनसेचा प्रश्न..

जागावाटपाबाबत शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस आणि शिवसेनेतही मतभेद नाहीत, तसेच वंचित आणि शिवसेना यांची आधीच युती झाली आहे. ही युती असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीस महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास कोणतीही हरकत नाही. त्यामुळे वंचित हा महाविकास आघाडीचा एक घटक आहे.

त्यामुळे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याशी त्याच सन्मानाने चर्चा आणि वाटाघाटी सुरू आहे. या देशात लोकशाही टिकवण्यासाठी मोदींचे हुकूमशाहीचे राज्य असू नये, यासाठी आंबेडकर महाराष्ट्र आणि देशात रान उठवत आहेत. ते फक्त महाराष्ट्रातील नेते नाहीत, तर समस्त देशातील वंचित आणि बहुजन समाजाचे नेते असल्याचे राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मेरीटनुसार जागावाटप होईल, असे सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, याबाबत काँग्रेसमध्ये कोणाला अधिकार आहेत, हे मला माहीत नाही. पण यासंदर्भात दिल्ली चर्चा होईल. वरिष्ठ पातळीवर सध्या तरी यासंदर्भात आमच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही.

अदानींची श्रीमंती हीच भाजपची श्रीमंती...

उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आणि भाजपवर खासदार राऊत यांनी हल्लाबोल केला. यावेळी त्यानी अदानींच्या माध्यमातून देशात लूट सुरू असल्याचा आरोप भाजपवर केला. ते म्हणाले, अदानी श्रीमंत आहेत म्हणजेच भाजप श्रीमंत आहे. या देशातील 138 कोटी जनता आजही संघर्षात आहे. मूठभर लोकांच्याकडेच पैसे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशात शंभर उद्योगपतींची 26 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ होत आहेत. पण दोन - पाच हजार रुपयांची शेतकऱ्यांची कर्जे माफ होत नाहीत आणि तेवढ्यासाठी तो आत्महत्या करीत आहे. अदानींची श्रीमंती हीच भाजपची श्रीमंती आहे. त्यांची श्रीमंती ही देशाची श्रीमंती आहे, हे मी मानत नाही. कारण त्यांच्यामुळे देश नाही, तर भाजप श्रीमंत झाली आहे.

देशातील सार्वजनिक मालमत्ता एकाच उद्योगपतीकडे दिल्यावर तो श्रीमंत होणारच. तीच परिस्थिती महानंद डेअरीची 27 एकर जमिनीच्याबाबतीत ते झाले, अशी लूट केल्याचा आरोप राऊत यांनी केला. अशी लूट सुरू असल्यावर श्रीमंत होण्याला काही हरकत नाही. पण सामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर श्रीमंत झाला आहे का? त्याला रोजगार मिळाला आहे का? याचं स्पष्टीकरण भाजपने केले पाहिजे.

शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट झाले आहे का ? त्याच्या मालाला हमीभाव आहे का? याचे उत्तर सरकारने द्यावे, यासाठीच आमचा संघर्ष सुरू असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या सरकारचे फक्त एका उद्योगपतीला श्रीमंत करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी देशातील क्षेत्रात त्यांना वाटा देण्याचे काम सुरू आहे. त्यातून उद्योगपती आणि भाजप दोन्ही श्रीमंत होत आहेत.

Sanjay Raut
Jitendra Awhad News : "हिंदू देवतांवर बोलण्यापेक्षा आव्हाडांनी मुंब्र्यात अफजल खानवर प्रवचनं द्यावी.."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com