Prithviraj Chavan News : शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितले !

Maharashtra Lok Sabha Election 2024 : दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे सरकार आले आणि विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली तरच सत्तेत सामील होण्यासाठी अनेक छोटे राजकीय पक्ष काँग्रेस पक्षाबरोबर हातमिळवणी करतील अथवा काँग्रेसमध्ये विलीन होतील.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Pune News : येणाऱ्या काळात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले होते. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार जे म्हणत आहेत त्याचा निर्णय लोकसभेच्या 4 जूनच्या निकालावर अवलंबून आहे, असे चव्हाण यांनी म्हंटले आहे. एका वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी यावर भाष्य केले आहे.

येणाऱ्या काळात अनेक छोटे राजकीय पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. ही मुलाखत ज्यावेळी सातारा येथे झाली त्यावेळी आपण तेथे उपस्थित होतो. पवार यांनी जे समीकरण मांडले आहे, ते प्रत्यक्षात होणार की नाही, याचा निर्णय 4 जूनच्या निकालावर होणार आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prithviraj Chavan
Lok Sabha Election 2024 : बारामतीत मतदानाचा टक्का घसरला, राष्ट्रवादीनं चंद्रकांतदादांवर फोडलं खापर? अजितदादांचीही खदखद बाहेर

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला (Congress) बहुमत मिळाले आणि जर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे सरकार आले आणि विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली तरच सत्तेत सामील होण्यासाठी अनेक छोटे राजकीय पक्ष काँग्रेस पक्षाबरोबर हातमिळवणी करतील अथवा काँग्रेसमध्ये विलीन होतील. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेत तथ्य असले तरी या सर्व गोष्टी लोकसभा निवडणुकीच्या निकालावरच अवलंबून असल्याचा पुनरूच्चार चव्हाण यांनी केला.

पवार यांना मुलाखतीमध्ये तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) काँग्रेसमध्ये विलीन होईल का ? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फारसे वैचारिक अंतर नाही. पक्षातील सहकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली नाही. पक्षातील ज्येष्ठ सहकाऱ्यांबरोबर आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेईन, असे उत्तर पवार यांनी मुलाखतीमध्ये दिले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला किती जागा मिळतात, यावर अनेक गोष्टी अवलंबून असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Prithviraj Chavan
Ajit Pawar News : आईसोबत गेलो तर तुमच्या पोटात का दुखलं, अजितदादांचा सवाल !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com