Maratha Andolan : एकनाथ शिंदेंना डिवचलं!मुंबई अन् नवी मुंबईतील गुलालावर संजय राऊतांनी उपस्थित केली शंका

Maratha Andolan : मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गुलाल उधळून आपला विजय झाल्याचं काल घोषित केलं.
Sanjay Raut,Eknath Shinde, Devendra Fadnavis
Sanjay Raut,Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maratha Andolan : मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गुलाल उधळून आपला विजय झाल्याचं काल घोषित केलं. पण असाच विजयाचा गुलाल त्यांनी गेल्यावर्षी नवी मुंबईतही उधळला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मागण्या करत शासन निर्णयही काढला होता. त्यानंतर जरांगेंनी आपला विजय झाल्याचं म्हणत गावाकडं फिरले होते. पण वर्ष भरातच त्यांना पुन्हा मुंबईत येऊन आमरण उपोषण घोषित करावं लागलं होतं. यापार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे.

Sanjay Raut,Eknath Shinde, Devendra Fadnavis
OBC Sub Committee: ओबीसी उपसमितीत 'या' मंत्र्यांचा समावेश; छगन भुजबळ, बावनकुळेंवर मोठी जबाबदारी

सरकारचं केलं कौतुक

राऊत म्हणाले, "जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा बांधवांचं मुंबईत मोठं आंदोलन झालं. काल सरकारनं मागण्या मान्य केल्या, जर जरांगे व आंदोलक समाधानी आहेत तर आम्हीही समाधानी आहोत. नवी मुंबईतही त्यांनी गुलाल उधळला होता. आता मुंबईतील गुलालात व नवी मुंबईच्या गुलालात काय फरक आहे? ते बघावं लागेल. जरांगे पाटील यांनी फडणवीस यांचे आभार मानले, ही चांगली गोष्ट आहे. सरकारचेही आम्ही अभिनंदन करतो"

Sanjay Raut,Eknath Shinde, Devendra Fadnavis
Pune-Mumbai Railway : आता पुणे ते मुंबई रेल्वे प्रवास होणार आणखी सोपा! राज्य शासनाची 'या' महत्वाच्या प्रकल्पाला मान्यता

शिंदे-पवार कुठे होते?

कालच्या प्रसंगात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? एकनाथ शिंदे गुलाल उधळायला नवी मुंबईत होते, पण काल मुंबईत गुलाल उधळायला ते दिसले नाहीत. याचं कारण काय? मुंबईत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राहणं गरजेचे होतं. कालचं संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचं आहे. ते या चर्चेत होते, सूचना देत होते. पण अजित पवार व एकनाथ शिंदे कुठे होते? ते आनंद सोहळ्यात का नव्हते? हे प्रकरण चिघळत राहावं आणि मुख्यमंत्री अडचणीत यावेत म्हणून काही करत होते का? हे काल प्रकर्षानं जाणवलं, असंही संजय राऊत पुढे म्हणाले.

Sanjay Raut,Eknath Shinde, Devendra Fadnavis
Yashomati Thakur : तिवसा मतदारसंघात अठरा वर्षांपूर्वी एकही मुल जन्माला आले नाही का? मत चोरीवरून यशोमती ठाकूरचा भाजपला सवाल

भाजप नेत्यांवर निशाणा

दरम्यान, राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधताना म्हटलं की, "ते अजूनही जरांगेंची कुचेष्टा करतात. भाजपचं पडद्यामागचं म्हणणं वेगळं आहे. भाजप दुतोंडी गांडुळासारखा आहे. जरांगेंबाबत भाजप नेत्यांची भाषा हीन दर्जाची होती. ती भाषा एकदा पंतप्रधान मोदींनी ऐकावी. मोदी रडतायत की आईला शिव्या दिल्या म्हणून, इथं जरांगे आणि मराठा आंदोलकांबाबत त्यांचे नेते कोणती भाषा वापरत होते, तेही ऐकावं त्यांनी.

जरांगे पाटील इथं आल्यावर जे टोकाचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न झाला. घाणेरडी भाषा वापरली, फक्त फडणवीस यांनी ही भाषा वापरली नाही. त्यांच्या संयमाचे कौतुक करतो. त्याचवेळी भाजपमध्ये बाहेर आलेले नेते यांनी ज्याप्रकारे जरांगेविषयी भाषा वापरली ती समर्थनीय नाही. नंतर लगेच त्याचे श्रेय घ्यायला येत आहेत, नक्की तुम्ही कोण व तुमची भूमिका काय?" असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com