
Nagpur News : भारताची लोकसंख्या दीडशे कोटींच्या घरात गेली आहे. आजवर लोकसंख्या नियंत्रण आणण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, त्यास कोणालाच आजवर यश आले नाही. जे 75 वर्षांत कोणी करू शकेल नाही ते मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने महाराष्ट्रात करून दाखवले. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत मत चोरीसाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधून लाखो मतदारांची नावे गहाळ करून लोकसंख्या कमी केली असल्याचा उपरोधिक टोला माजी मंत्री व काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी लगावला. यावेळी त्यांनी तिवसा विधानसभा मतदारसंघात अठरा वर्षांपूर्वी एकही पोर जन्माला आले नाही का? अशी विचारणाही भाजपला केली.
काँग्रेसच्यावतीने (Congress) बुधवारी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांच्या कामठी विधान सभा मतदारसंघात ‘व्होट चोर गद्दी छोड' राज्यवापी आंदोनला सुरुवात केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांच्यासह विदर्भातील काँग्रेसचे सर्व खासदार व आमदार प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या, देशाचे लोकसंख्या दररोज वाढते. मतदारांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात भर पडते. मात्र यावेळी माझ्या तिवसा मतदारसंघात चमत्कार झाला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच मतदारांची संख्या कमी झाली. माझ्या मतदार मतदारसंघातील 35 हजाराने लोकसंख्या कमी करण्याचे क्रेडिट भाजप सरकारला जाते. लोकसभेच्या निवडणुकीत 2 लाख 70 हजार मतदार होते. त्यातून संविधान आणि लोकशाहीला मानणाऱ्यांना मतदार याद्यांतून वगळण्यात आले.
2019 च्या निवडणुकीत 3 लाख 96 हजार मतदार होते. त्यानंतरच्या 2024 च्या निवडणुकीत मतदारांची संख्या तीन लाख 86 हजार झाली. याचे सर्व क्रेडिट सरकारालाच दिले पाहिजे असे उपहासाने सांगून यशोमती ठाकूर (Yashomati thakur) यांनी याबद्दल आपण जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन केल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या तिवसा विधानसभा मतदारसंघात 18 वर्षाआधी एकही मूल जन्माला आले नाही हे स्पष्ट होते असे सांगून या चोरांसाठी टाळ्या वाजवा, असे आवाहन केले.
हे सरकार फक्त व्होट चोरच नाही तर वाळू चोर, शेतमालाचे भाव चोर, पेट्रोलचे भाव चोरणारे आहे. या चोरांचा आता बंदोबस्त करायलाच पाहिजे. राहूल गांधी यांनी यांची चोरी पकडली आहे असल्याचे ठाकूर म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.