भाजपचे प्रवक्ते उपाध्ये अन् राऊतांच्या गुप्त भेटीनं चर्चांना उधाण

राऊत यांच्यावर भाजप टीका करत असताना उपाध्ये हे संजय राऊत यांना भेटायला त्यांच्या हॉटेलवर का पोहचले, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
Sanjay Raut,Keshav Upadhye
Sanjay Raut,Keshav Upadhyesarkarnama
Published on
Updated on

पणजी : गोवा विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye)व शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांच्यावर भाजप टीका करत असताना उपाध्ये हे संजय राऊत यांना भेटायला त्यांच्या हॉटेलवर का पोहचले, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

पणजीमधील मँरिएट हाँटेलमध्ये केशव उपाध्ये आणि संजय राऊत यांच्यात ही गुप्त भेट झाली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुन्हा युती होईल का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून संजय राऊत आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. पण आता या दोन्ही नेत्यांमध्ये काय खलबते झाली असतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Sanjay Raut,Keshav Upadhye
मोठी बातमी : सोमय्या अडचणीत ; राऊतांचे निकटवर्तीय पाटकरांकडून नोटीस

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पुढील महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर गोव्यात शिवसेनाही निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. त्यामुळे ही महत्वाची ठरली आहे. गोवा विधानसभेसाठी शिवसेनेचे अकरा उमेदवार रिंगणात आहे. शिवसेनेचा गोवा निवडणुकीचा जाहीरनामा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जाहीर होत आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आदित्य ठाकरे यांची वास्को येथे सभा घेतली. याप्रसंगी त्यांनी शिवसेनेचं धोरण नेमकं काय असणार हे सांगितलं. ते म्हणाले की शिवसेनेचा दररा काय असतो, शिवसेना आली म्हणजे नक्की काय असतं? हे या गोव्याच्या राजकारणाला आता कळायला लागलेलं आहे.

Sanjay Raut,Keshav Upadhye
'जय श्रीराम' बोलून मुलींचा छळ ; हा द्वेष तुमच्या घरात चालेल का? कॉग्रेसचा सवाल

आदित्य ठाकरे म्हणाले, ''या राज्याशी आपलं वेगळं नातं आहे. कित्येक जणांचे कुलदैवतं, मंदिरं, गावं, घरं इथे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जसं सांगितलेलं आहे की भूमिपुत्रांना न्याय द्या, तेच काम आपण आज इथे करण्यासाठी आलेलो आहोत. जरी आज आपलं महाराष्ट्रात राज्य असेल, सरकार असेल आपण सगळे प्रचारासाठी तिथून आलेलो आहोत. जेव्हा गोवा बद्दल आपण बोलतो तेव्हा आपण प्राधान्य स्थानिक गोवेकरांना देणार आहोत. हा मी तुम्हाला शब्द देतो,''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com