Nitesh Rane Vs Sanjay Raut : संजय राऊत अन् नितेश राणेंनी पातळीच सोडली; थेट अंतर्वस्त्रावरून टीका केली

Mumbra Shivsena UBT : ठाकरे, पवार घरात राऊतांनी कुरघोड्या केल्या
Nitesh Rane, Sanjay Raut
Nitesh Rane, Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

आनंद सुरवसे

Mumbai Political News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंब्रा येथील शाखेला भेट देण्यास शिंदे गटाकडून विरोध झाला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तोंडसुख घेतले होते. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी सोमावरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनीही पातळी सोडत राऊतांवर एकेरी भाषेमध्ये निशाणा साधला. दोन्ही नेत्यांच्या भाषेमुळे राज्यातील राजकारण ढवळण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

राऊत म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत. ते आता भाजपमध्ये गेले असून, आत्ताच ते भाजपचे गुलाम झाले आहेत. गुलामांना स्वत:चा स्वाभिमान नसतो. आता त्यांच्या अंतर्वस्त्रावर कमळाचाच शिक्का दिसेल', अशा शब्दांत राऊतांनी शिंदे यांच्यावर तोफ डागली.

यानंतर त्यांनी भाजपकडे मोर्चा वळवला. 'भाजपची तोडा आणि फोडा ही नीती असून, त्यांचे शिवसेनेला संपवण्याचे स्वप्न आहे. त्यांनी आमच्या लोकांना फोडून हे सरकार स्थापन केले आहे. त्यांनीच मराठी माणसांमध्ये फूट पाडली. आता त्यांनाच आमच्याविरोधात उभे केले जात आहे', असाही आरोप संजय राऊत यांनी केला.

Nitesh Rane, Sanjay Raut
Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला शासकीय नोकरी देणार; मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन

नितेश राणेंनीही सोडली पातळी

संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही पातळी सोडली. राणे म्हणाले 'संजय राऊत यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी अश्लील भाषा वापरताना लाज वाटली नाही का? त्यांना हीच भाषा बोलायची असेल तर हॉटेल आयटीसी, नोव्हेटल आणि ताजमध्ये कोण अंतर्वस्त्र विसरायचे, याबाबच बोलू का? राऊतांच्या अंतर्वस्त्रावर मशालीचे चिन्ह आहे का घड्याळाचे? का आता हाताचा पंजाचे चिन्ह लागेल आहे? आता तुमचा पगार 10 जनपथ वरून येतो,' असे म्हणत नितेश राणेंनी राऊतांवर सडकून टीका केली आहे.

राऊतांना कोणी घरात उभं करणार नाही

संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना फोडा आणि राज्य करा, अशी भाजपची नीती असल्याची टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले 'राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा संजय राऊतांची गाडी का फोडली होती? राऊत यांनीच ठाकरे, पवार यांच्या घरात कुरघोड्या केल्या आहेत. आता आदित्य आणि तेजस ठाकरे यांच्यामध्ये भांडणे लावण्याचे काम कोण करत आहे? याबाबतची माहिती जनतेला दिली तर संजय राऊत यांना कोणी उभे करणार नाही, असा इशाराही राणेंनी या वेळी दिला.

(Edited by Sunil Dhumal)

Nitesh Rane, Sanjay Raut
Beed News : कामगारांसाठीची मध्यान्ह भोजन योजना बंद; दिवाळीत बीडमध्ये ठेचा भाकर आंदोलन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com