Sanjay Raut News : संजय राऊत शिवसेना पक्ष सोडणार; 'या' पक्षात करणार प्रवेश; भाजप नेत्याचा मोठा दावा

Shivsena Vs BJP : ''ठाकरे मला खासदार करणार नाही...''
Sanjay Raut Latest Marathi News
Sanjay Raut Latest Marathi News Sarkarnama

Maharashtra Politics: संजय राऊत यांना कट्टर शिवसेना नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत आलेल्या प्रत्येक चढ उतारात त्यांनी कायम आपल्या पक्षाची साथ दिली. एवढंच काय मागील वर्षी झालेल्या शिवसेनेतील उभ्या फुटीनंतरही राऊत आजही खंबीरपणे उध्दव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले. आणि ते समर्थपणे पक्षाचा किल्ला लढवत आहे. पण आता भाजप नेते व आमदार संजय राऊत हे शिवसेना पक्ष सोडणार असल्याचा मोठा दावा केला आहे.

नितेश राणे(Nitesh Rane) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राणे म्हणाले, पुढील आठवड्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. 10 जूनच्या आधी किंवा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी त्यांच्या बैठका झाल्या आहेत. बोलणी झाली आहे. मला ही माहिती सूत्रांनी दिल्याचं राणे यांनी केला आहे.

Sanjay Raut Latest Marathi News
Abhijeet Patil Join NCP : 'विठ्ठल'चे अध्यक्ष अभिजित पाटील यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

संजय राऊत यांच्या गेल्या काही दिवसांतील भूमिका पाहा. शरद पवारांच्या राजीनामा आणि नंतरची राऊत यांची भूमिका पाहा. त्यातून तुम्हाला सर्व अर्थ लागतील असंही विधान राणे यावेळी म्हणाले.

संजय राऊत(Sanjay Raut) सातत्याने अजितदादांवर टीका करत आले आहेत. अजितदादांनी पक्ष सोडला तर मी लगेच पक्षप्रवेश करतो, अशी अटच त्यांनी घातली आहे. त्यामुळे ते सातत्याने अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. टीका करत आहेत. ते फक्त राऊत करत आहेत. उद्धव ठाकरे यांचं खरं नाही. त्यांचा पक्ष राहिला नाही. उद्धव ठाकरे मला खासदार करणार नाही. मला उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात अर्थ राहिला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी(NCP)त प्रवेश द्या, असं राऊत यांनी राष्ट्रवादीला कळवलं आहे, असा दावाही नितेश यांनी केला आहे.

Sanjay Raut Latest Marathi News
BJP politics : भाजपचे माजी मंत्री काँग्रेसमध्ये ; मोदीचं टि्वट रिटि्वट करुन सांगितली 'मन की बात..', अश्रू अनावर

उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकरणी महाराष्ट्र पेटवून देण्याची भाषा केली होती. त्याला नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र सोडा, साधी मुंबई बंद करून दाखवा. मुंबई जमत नसेल तर कलानगर बंद करून दाखवा, असं आव्हानच नितेश राणे यांनी दिलं आहे.

ठाकरे मला खासदार करणार नाही...

नितेश राणे यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजितदादांनी पक्ष सोडला तर मी लगेच पक्षप्रवेश करतो अशी अट राऊतांनी घातली असल्याचंही ते राणे यांनी सांगितलं. राणे म्हणाले, राऊत मागील काही दिवसांत अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. टीका करत आहेत. ते फक्त राऊत करत आहेत.

Sanjay Raut Latest Marathi News
Eknath Shinde News: राजकीय भवितव्याबाबत शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ?

एका माणसामुळे पक्ष फुटला...

उद्धव ठाकरे यांचं खरं नाही. त्यांचा पक्ष राहिला नाही. उद्धव ठाकरे मला खासदार करणार नाही. मला उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray)सोबत राहण्यात अर्थ राहिला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश द्या असं राऊत यांनी राष्ट्रवादीला कळवलं आहे असाही खुलासा राणे यांनी केला आहे. राऊतांनी ठाकरे यांच्या घरात भांडणं लावली. आता राष्ट्रवादीत गेल्यावर उद्धव ठाकरेंना चित्र स्पष्ट होईल. एका माणसामुळे पक्ष फुटला हे त्यांना कळेल असंही ते म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com