Shinde-Thackeray Politics : मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्रकार परिषदेला संजय राऊत जाणार

Chhatrapati Sambhajinagar Politics : छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची उद्या बैठक होणार आहे.
Shinde-Thackeray Politics :
Shinde-Thackeray Politics : Sarkarnama

Mumbai Political News : विद्यमान खासदार आणि दैनिक 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला पत्रकार म्हणून जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यापूर्वी होणाऱ्या पत्रकार परिषदेला आपण पत्रकार म्हणून जाणार असून मुख्यमंत्र्यांना प्रश्नही विचारणार असल्याचं खुद्द संजय राऊत यांनीच सांगितलं आहे. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये उद्या (१६ सप्टेंबर) राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांची पंरपरा शिंदेंच्या सरकारने मोडीत काढली आहे. आतापर्यंत मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्र्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात असायचा. पण यावेळी होणाऱ्या बैठकीसाठी मात्र पंचतारांकित हॉटेल्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

Shinde-Thackeray Politics :
Shinde's MLA On Raut : विदर्भातील शिंदेंच्या `या’ आमदाराने काढली संजय राऊतांची अक्कल !

याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. वेगवेगळ्या भागात बैठका घेतल्याने तेथील स्थानिक प्रश्न समोर येत असताता. हे सरकार फक्त मुंबईकेंद्रीत असू नये, महाराष्ट्र खूप मोठा आहे. पण तुम्ही एवढा मोठा फौजफाटा, लवाजमा घेऊन पर्यटनाला जाता, पण त्यातून मराठवाड्याला काय मिळणार हा प्रश्न आहे. २०१६ मध्ये आपण बैठक घेतली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० कोटींच्या घोषणा केल्या. त्यावेळी त्यांनी एक दुध डेअरी संदर्भात एका योजनेतून सव्वा कोटी लोकांना रोजगार देऊ, अशी घोषणा केली. पण काय झालं त्याचं? जर त्या योजना त्याचवेळी पूर्ण झाल्या असत्या तर जालन्यात मनोज जरांगे यांनी आंदोलन करण्याची वेळही आली नसती.

उद्या राज्याचं मंत्रिमंडळ मराठवाड्यात बैठकीसाठी जात आहे. मी आज वाचलं की ४० हजार कोटींचं पॅकेज देणार पण तुमच्या तिजोरीत पैसा आहे का. असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. तुम्ही आधीच्या घोषणा तरी पूर्ण करा. पण त्यांना एक पैसाही खर्च करण्याचा अधिकार नाही. मुळात हे सरकारच बेकायदेशीर आहे. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

तसेच, राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेल बुक केल्याप्रकरणीही त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शासकीय विश्रामगृह असतानाही पंचताराकित हॉटेल त्यांनी बुक केलं आहे. हा जनतेच्याच पैशावर डल्ला मारला आहे. असे लोक सत्तेवर येतात तेव्हा राज्याचा विकास मागे जातो. पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून अशा दुष्काळी भागासाठी बैठका होत नाहीत.

तुम्ही आमच्यावर टीका करता करता आम्ही घरी बसून काम केलं पण तो कोरोनाचा काळ होता आमच्या मुख्यमंत्र्यांनीही घरी बसून काम केलं पण तो शासकीय बंगला होता. संपूर्ण संभाजीनगर मधील हॉटेल बुक केल्याचं मला चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं पण सगळे हॉटेल कुणासाठी बुक केलेत, असाही प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला. याचा खर्च कोण करतयं. सरकारी तिजोरीवर तुम्ही भार का देताय पण विचारणार कोण ...?

कॅबिनेटची बैठक तीन तासांची आहे. त्यानंतर आम्ही बोलूच, ते किती खोटं बोलत आहेत हे आम्हाला पाहायचं आहे. आम्हाला पोलिसांनी अडवलं नाही तर आम्हीही त्या पत्रकार परिषदेला जाऊ. पण पोलिस आम्हाला परवानगी देतात की नाही तेही महत्त्वाचं आहे. असंही संजय राऊतांनी म्हटले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Shinde-Thackeray Politics :
Bachchu Kadu News : नवनीत राणा-ठाकूर यांच्यातल्या वादाला 'कडू' फोडणी; म्हणाले, "पैसे देणारा-घेणारा..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com