Chandrakant Patil Vs Ravindra Dhangekar : चंद्रकांतदादांनी ठेवलं धंगेकरांच्या दुखऱ्या नसेवर बोट; म्हणाले...

Chandrakant Patil On Sanjay Raut : "मी आत्तापर्यंत कधीही पळ काढला नाही. माझ्या पालकमंत्रीपदाच्या काळात पुण्यामध्ये ड्रग्ज रॅकेटसारखे प्रकार घडले नाहीत," असं प्रत्युत्तर पाटील यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.
chandrakant patil ravindra dhangekar
chandrakant patil ravindra dhangekarsarkarnama

Pune News : पुणे शहरामध्ये सातत्याने ड्रग्ज प्रकरण समोर येत आहेत. यामुळे पुण्यासह राज्याचे राजकारण ढवळून निघाले असून राजकीय आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत.

या ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांच्याकडून सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. त्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांना काही सल्ले दिले आहेत.

चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी आज पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला ड्रग्ज प्रकरणावर भाष्य केलं. "पुणे शहरात ड्रग्सचं प्रमाण वाढत असून हे चिंताजनक आहे. मात्र, यामुळे 70 लाख लोकसंख्या असलेलं शहर पूर्णपणे वाया गेलं, असं म्हणणं चुकीचं आहे. त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. मात्र, ती तात्पुरती असायला नको. ड्रग्ज प्रकरणावरती उपाय योजना करताना नागरिकांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. शहरातील दारूची दुकानं संपूर्णपणे सात दिवस बंद ठेवून नागरिकांच्या सहभागातून एका व्यासपीठावरती येत नियमावली तयार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आवश्यकता पडताच समाजातील मान्यवरांची समिती स्थापन करावी," असं पाटील यांनी सांगितलं.

"उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक कॉलेजमध्ये एक नव्याने पोस्ट निर्माण करून समुपदेशकाची नेमणूक करता येईल का? याची चाचपणी करत आहोत. या माध्यमातून ड्रग्ज कडे आणि नशाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न असेल," असं पाटील यांनी म्हटलं.

chandrakant patil ravindra dhangekar
MLA Sunil Tingre : टिंगरेंना टोमणा हाणत, मुळीकांनीं ठोकला विधानसभेवर दावा !

चंद्रकांत पाटील यांना ड्रग्ज प्रकरणावर पळ काढता येणार नाही, असं विधान शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. याबद्दल बोलताना पाटील म्हणाले, "मी आत्तापर्यंत कधीही पळ काढला नाही. माझ्या पालकमंत्रीपदाच्या काळात पुण्यामध्ये ड्रग्ज रॅकेटसारखे प्रकार घडले नाहीत. या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. पण, अजित पवार आणि माझ्यात वाद निर्माण करण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत. तो यशस्वी होणार नाही. मी त्यादिवशी स्पष्टपणे बोललो होतो की या प्रकरणांमध्ये कोण्या एका मंत्र्यांना दोषी धरता येणार नाही. मात्र, माझी अर्धवट क्लिप दाखवण्यात आली. आता ही सविस्तर क्लिप अजितदादांना दाखवा आणि सांगा की मी असं काही बोललो नाही."

"मी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह सर्वांनाच विनंती करतो की, ड्रग्ज प्रकरण हे चिंताजनक आहे. मात्र, त्यामुळे सत्तर लाखाचं पुणे संपूर्णपणे वाया गेलं, असं चित्र उभं करणे कुठेतरी चुकीचं आहे. यामुळे भविष्यात मोठी महाविद्यालय, उद्योगधंदे, रूग्णालय येण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात," असं चंद्रकांत पाटील म्हटलं.

chandrakant patil ravindra dhangekar
Mahayuti : दादांचे आमदार असलेल्या जागांवर शिंदेंचा दावा, महायुतीत जागा वाटपाचा पेच वाढणार?

"राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहावं. लोकसभेला कोणाची किती ताकद आहे हे दिसलं," असं म्हणत पाटील यांनी धंगेकरांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं आहे.

"लोकसभा निवडणूक आम्ही जिंकली. मात्र, मी असं म्हणणार नाही की धंगेकर संपले आणि भाजप जिवंत राहिली. पण, राजकारण हे निवडणुकीपुरतं ठेवावं. राजकारणामुळे आपल्या शहर डॅमेज होतंय का? याचा विचार राजकारण्यांनी करायला हवा," असा सल्ला पाटील यांनी धंगेकर यांना दिला आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com