Brij Bhushan Singh News : खासदार ब्रिजभूषण सिंह यांना योगी सरकारचा झटका : घेतला मोठा निर्णय...

खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी एका निवेदनाद्वारे रॅली रद्द करण्याची घोषणा केली आहे.
Brij Bhushan Singh
Brij Bhushan Singh Sarkarnama

लखनऊ : कुस्तीपट्टूंच्या लैगिंक शोषणाचा आरोप असलेले भारतीय जनता पक्षाचे खासदार तथा भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा धक्का बसला आहे. योगी सरकारने त्यांना पाच जून रोजी अयोध्येत रॅली काढण्यासाठी परवानगी नाकारली आहे. त्यानंतर खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी एका निवेदनाद्वारे रॅली रद्द करण्याची घोषणा केली आहे. (Yogi government denied permission to MP Brijbhushan Singh to hold a rally in Ayodhya)

निवेदनात ब्रिजभूषण सिंह (Brij bhushan Singh) यांनी म्हटले आहे की, माझ्या प्रिय शुभचिंतकांनो...मी २८ वर्षांपासून तुमच्या स्नेहभावाने लोकसभा सदस्य म्हणून संवैधानिक पदावर आहे. सत्तेत असताना आणि विरोधात असताना मी नेहमीच सर्व जाती, समाज, धर्माच्या लोकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे. याच कारणांमुळे माझे राजकीय विरोधक आणि त्यांचे पक्ष माझ्यावर खोटे आरोप करत आहेत

Brij Bhushan Singh
Wrestlers Protest News : आंदोलक कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ '1983 विश्वचषक विजेता संघ' उतरला मैदानात!

सध्याच्या घडामोडीत काही राजकीय पक्ष आपले भविष्य शोधत आहेत. ठिकठिकाणी सभा घेऊन प्रांतवाद, प्रादेशिकवाद, जातीय संघर्ष भडकावून सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या विचारात मग्न आहेत. पण, देशविरोधी शक्तींना सामाजिक सलोखा बिघडवू देण्याच्या बाजूने मी नाही.

Brij Bhushan Singh
Sushilkumar Shinde News : ‘शंकरराव मोहिते पाटलांपासून मी अकलूजला जातोय; पण, काही लोकं भांडणं लावण्याचं काम करतात’ : सुशीलकुमार असं का म्हणाले

समाजात पसरलेल्या दुष्कृत्यांवर चिंतन करण्यासाठी काही संतांना ५ जून रोजी अयोध्येत संत संमेलन भरवायचे होते. पण, आता पोलीस आरोपांची चौकशी करत आहेत, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत संतांच्या सूचनेवरून ‘जनजागरण’ महारॅलीचा (Rally) ५ जूनचा अयोध्या (Ayodhya) चलो कार्यक्रम स्थगित करण्यात आा आहे.

सर्व धर्म, जाती, प्रांतातील लाखो समर्थक, हितचिंतकांनी मला या विषयावर पाठींबा दिला आहे, त्यामुळे सर्वांचे आभार व्यक्त करताना मी व माझे कुटुंबीय तुमचा सदैव ऋणी राहू, अशी ग्वाही देतो.

Brij Bhushan Singh
BJP on Brijbhushan Singh: कुस्तीपटूंच्या आंदोलन प्रकरणी भाजप हायकमांड अॅक्शन मोडवर; ब्रिजभूषण सिंहांना दिले महत्त्वाचे निर्देश

प्रस्तावित रॅलीमध्ये अयोध्येचे महंत पॉक्सो कायद्यात दुरुस्तीची मागणी करणार होते. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत संतांनी काही कायद्यांचा गैरवापर होत असल्याचे म्हटले होते. येत्या पाच जून रोजी काही संत एकत्र येऊन काही कायद्यांमध्ये दुरुस्तीची मागणी करणार आहे. खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना पाठिंबा देताना त्यांनी सांगितले की, ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांमध्ये एक दुष्टचक्र आढळून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com