Sanjay Shirsat : शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंची शिंदेंच्या नेत्याकडून पाठराखण, म्हणाले,

Sanjay Shirsat on Sambhaji Bhide Guruji's Statement : भिडे गुरुजींच्या वक्तव्यावरून विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. मात्र याचवेळी शिंदे गटाच्या नेत्यांनी मात्र भिडे गुरुजी यांची पाठराखण केल्याचं दिसून आलं.
Sanjay Shirsat on Sambhaji Bhide
Sanjay Shirsat on Sambhaji Bhide Sanjay Shirsat
Published on
Updated on

Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी रविवारी (ता.30 जून) पुण्यातील एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरून विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. यापूर्वीही भिडे अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आले आहे. मात्र, एकीकडे विरोधकांनी टीकेची झोड उडवल्यानंतर आता सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी मात्र भिडे गुरुजी यांची पाठराखण केली आहे.

पुण्यात श्री शिवप्रतिष्ठान आयोजित मेळावा या कार्यक्रमादरम्यान बोलताना संभाजी भिडे यांनी स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या पूजेला जाताना साडी नेसूनच जावं. इतर ड्रेस,जीन्स पॅन्ट वगैरे घालून जाऊ नये, असं म्हटलं होतं.त्यांच्या याच वक्तव्याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat ) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भिडे गुरुजी यांची पाठराखण केली. शिरसाट म्हणाले, जी आपली संस्कृती आहे त्यानुसार वागले पाहिजे, संस्कृतीचा ठेवा जपला पाहिजे, असं म्हणत त्यांनी भिडेंच्या (Sambhaji Bhide) वक्तव्याला एकप्रकारे पाठिंबाच दर्शवला आहे.

Sanjay Shirsat on Sambhaji Bhide
Sambhaji Bhide News : '..त्या महिलांनी वटसावित्रीच्या पूजेला जाऊ नये' ; संभाजी भिडेंच्या विधानाने पुन्हा वाद उफळण्याची चिन्हं!

मात्र याचवेळी त्यांनी मी त्यांच्या सर्वच मतांशी सहमत नसल्याचं ते म्हणाले. पत्रकारांनी आपणाला मिळालेले स्वातंत्र्य दळभद्री आहे असं भिडे यांनी वक्तव्य केल्याचं सांगितलं असता शिरसाट म्हणाले, मी त्यांच्या सर्वच वक्तव्याशी सहमत नाही.

Sanjay Shirsat on Sambhaji Bhide
Sambhaji Bhide : पुण्यात संभाजी भिडे स्वातंत्र्याबाबत बरळले; म्हणाले, आपल्याला....

सरकारमधील मंत्र्यांसाठी भिडे गुरुजी ऋषितुल्य

दरम्यान सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारमधील मंत्र्यांसाठी संभाजी भिडे ऋषितुल्य असून त्यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता नाही असे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर आता शिरसाट यांनी संभाजी भिडे यांचे पाठराखण केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com