Sarpanch News : लाच घेणाऱ्या महिला सरपंचाला पदावरून हटवले, विकासकामात 2 टक्के मागितले; रसिका पाटलांनी कार्यभार स्वीकारला!

Shobha Gawari Sarpanch Konkan Commissione : विकासकामांच्या बिलाची मंजुरीसाठी दोन टक्के हिस्सा लाच म्हणून स्वीकारणाऱ्या महिला सरपंचाला कोकण आयुक्तांनी पदावरून हटवसे आहे.
Rasika Patil takes charge as Sarpanch
Rasika Patil takes charge as Sarpanchsarkarnama
Published on
Updated on

दिलीप पाटील

Vada News : वाडा तालुक्यातील गावामध्ये विकासकामाचे बील मंजुर करण्यासाठी निधीतील दोन टक्के रक्कमेची मागणी करत पैसे स्वीकारताना महिला सरपंचाला रंगेहाथ पकडण्यात आले होते. वाडा तालुक्यातील सापरोंडे मांगाठणे ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले होते. सरपंच शोभा गवारी यांनी ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करण्याचे बील मंजूर करण्यासाठी मोबदला म्हणून एकूण रकमेच्या दोन टक्के प्रमाणे 20 हजार रूपये रकमेची मागणी केली होती.

ती रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडून अटक केली होती. ही घटना एप्रिल महिन्यात घडली होती. आता रिक्त सरपंचपदाचा कार्यभार उपसरपंच रसिका पाटील यांनी स्वीकारला.

पदावरून का हटवले?

ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन परिपत्रक क्र व्हीपी एम 2010/प्र क्र 273/ पंरा 3 दि 18 जून 2011 मधील 2 नुसार ज्या ठिकाणी सरपंच, उपसरपंच वा सदस्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले जाते व लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येतो.

अशा दोषींविरूद्ध मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39 नुसार कारवाई करण्यात यावी असा नियम आहे. या नियमाच्या आधारे सरपंच शोभा गवारी यांना पदावरून हटविण्यात आले आहे. ही कारवाई कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डाॅ विजय सुर्यवंशी यांनी केली आहे.

Rasika Patil takes charge as Sarpanch
Eknath Khadse : युतीसाठी भाजप सोडून सगळे चालणार, एकनाथ खडसेंनी बैठक घेऊन घोषणाच करुन टाकली

रसिका पाटील यांनी पदभार स्वीकारला

ग्रामपंचायतीचा प्रशासकीय व आर्थिक व्यवहार पार पाडण्यासाठी सरपंच यांचे रिक्त असलेल्या पदाचा कार्यभार उपसरपंच रसिका रोहीदास पाटील यांचेकडे सोपवण्याचा आदेश वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांनी दिला होता. त्याअनुषंगाने उपसरपंच रसिका पाटील यांनी सरपंच पदाचा पदभार दोन दिवसांपूर्वी स्वीकारला.

Rasika Patil takes charge as Sarpanch
BJP Vivek Kolhe Vs NCP : भूलथापा देत आमदारकी काढली, आता नाही..; पालिका निवडणुकांसाठी भाजपच्या विवेक कोल्हेंनी भरला दम

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com