Congress News: सत्यजीत तांबेंची टीका झोंबली; काँग्रेसचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले,'तुमच्या आवडत्या भाजपला व ज्यांच्या मांडीवर बसण्यात...'

Satyajeet Tambe On Women Reservation Bill : नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी महिला आरक्षण विधेयक संसदेत अपयशी ठरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी 'एक्स'वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आजचा दिवस दुःखद आहे, कारण महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झाले
Satyajeet Tambe Congress
Satyajeet Tambe CongressSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी मोदी सरकारने आणलेले नारीशक्ती वंदन विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत काँग्रेससह विरोधकांवर सडकून टीका केली होती. यावेळी त्यांनी "आजचा दिवस दुःखद आहे, कारण महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झाल्याचं म्हटलं होतं. यावेळी त्यांचा टीकेचा रोख काँग्रेसकडे असल्याचं दिसून येत आहे. आता काँग्रेसनं तांबे यांच्या टीकेवर जोरदार पलटवार केला आहे.

काँग्रेसनं शनिवारी(ता.18) आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून आमदार सत्यजीत तांबे यांच्यावर निशाणा साधला आहे. या पोस्टमध्ये काँग्रेसनं सर्जेराव, ज्या ताटात जेवलात, त्याच ताटात घाण नसते करायची असा टोला लगावला आहे.

तसेच काँग्रेसनं पुढं पोस्टमध्ये आपण जो उल्लेख केलात की, भारत महिलांच्या हक्कांच्या बाबतीत सर्वात प्रगतिशील राष्ट्रांपैकी एक आहे, ते कॉंग्रेस पक्षाच्या सत्ताकाळातच झालंय. काँग्रेसनेच त्याचा पाया रचला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वांप्रमाणेच महिलांनाही मतदानाचा हक्क विनासंघर्ष मिळाला, तो ही कॉंग्रेसच्या काळातच असा संदर्भ देत तांबे यांना फटकारल्याचं दिसून येत आहे.

काँग्रेसनं सत्यजीत तांबे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकेची तोफ डागली आहे. 2023 मध्येच ‘नारी शक्ती वंदन अधिनियम - २०२३’ काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे पारित झालेलं आहे, तुमच्या आवडत्या भाजपला व ज्यांच्या मांडीवर बसण्यात आपल्याला सुख मिळतं त्या देवेंद्र फडणवीसांना विचारा की, ते 2023 मध्ये पारित झालेल्या विधेयकाची अंमलबजावणी का करत नाही. कोण खोटं बोलत आहे, तुम्ही की तुमचे लाडके देवाभाऊ ?असा जशास तसं प्रत्युत्तर काँग्रेसनं या पोस्टमध्ये आमदार तांबेंना दिलं आहे.

Satyajeet Tambe Congress
Sanjay Raut Defamation Case: संजय राऊत मानहानी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; भाजप मंत्री नितेश राणेंविरुद्ध माझगाव कोर्टानं काढलं वॉरंट

तांबे यांनी पोस्ट काय?

नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी महिला आरक्षण विधेयक संसदेत अपयशी ठरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी 'एक्स'वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आजचा दिवस दुःखद आहे, कारण महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झाले. या धक्क्यानंतरही, भारत महिलांच्या हक्कांच्या बाबतीत सर्वात प्रगतिशील राष्ट्रांपैकी एक असल्याचं म्हटलं होतं.

तसेच लक्षात ठेवा, अमेरिकेत महिलांना मतदानाच्या हक्कासाठी अनेक दशके लढा द्यावा लागला. पण भारतीय महिलांना सुरुवातीपासूनच मतदानाचा हक्क होता. हा पराभव भारतीय महिलांसाठी एक मोठा धक्का आहे. परंतु संविधानाची समानतेची भावना आपल्याला पुढेही मार्गदर्शन करत राहील,असा अप्रत्यक्ष टोलाही काँग्रेससह विरोधकांना लगावला होता.

सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीपासून काँग्रेस, महाविकास आघाडीपासून फारकत घेतल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला नव्हता. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा, मामा बाळासाहेब थोरातांसाठी त्यांनी काम केलं. थोरातांचा पराभव झाल्यानंतर, ते आता संगमनेर मतदारसंघात प्रचंड सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com