Maharashtra Cabinet Expansion : 'वर्षा'वर मध्यरात्रीपर्यंत गुप्त बैठक; अजितदादा एक तास उशीरा आले अन् लवकर..

Maharashtra Cabinet Expansion : कोणाला कोणती खाती मिळणार?
Eknath Shinde : devendra Fadnavis : Ajit Pawar
Eknath Shinde : devendra Fadnavis : Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता राष्ट्रवादीच्या आमदारांना खातेवाटपाचे वेध लागले आहेत. त्यातच अजित पवारांच्या सरकारमधील एन्ट्रीमुळे आता शिवसेना शिंदे गट तसेच भाजपमधील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, असे बोलले जात आहे. (Maharashtra Cabinet Expansion)

Eknath Shinde : devendra Fadnavis : Ajit Pawar
Chhagan Bhujbal Death Threat : छगन भुजबळांना जीवे मारण्याची सुपारी? धमकीच्या फोनने खळबळ..

खातेवाटपाच्या या तिढ्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये काल (ता.११) रात्री उशीरापर्यंत मुख्यंमंत्री यांचे निवासस्थान वर्षावर बैठक पार पडली. ही बैठक तब्बल तीन तास चालली असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही दाखल झाले होते. विशेष म्हणजे वर्षा बंगल्यावर फडणवीस दाखल झाल्यानंतर तब्बल एक तास नऊ मिनिटांनी अजित पवार या बैठकीसाठी पोहचले. आणि बैठक संपण्याच्या एक तास अगोदरच ते आपल्या देवगिरी बंगल्यावर निघून आले. (Latest Marathi News)

या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. या तीन तासाच्या बैठकीत कोणती खाती कुणाला? ?या संदर्भातही चर्चा झाली असल्याचे बोलेल जात आहे. बैठकीसाठी एका तास उशीरा पोहोचलेले अजित पवार हे फडणवीसांचा बैठक संपण्याआधीच आपल्या देवगिरी निवासस्थानी परतले.

Eknath Shinde : devendra Fadnavis : Ajit Pawar
Pimpri-Chinchwad News : राज्यातील राजकारणावर पिंपरी-चिंचवडकारांनी 'असा' व्यक्त केला संताप !

अशातच एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये वर्षावर झालेल्या बैठकीनंतर आता खातेवाटप अंतिम झाले आहे का? याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडे कोणते खाते जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com