स्वरांचं चांदण शिंपडणाऱ्या गानसम्राज्ञीला साश्रू नयनांनी निरोप...

लतादीदींच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून उद्या राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
Lata Mangeshkar
Lata Mangeshkarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांनी आज (6 फेब्रुवारी) अखेरचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू होते. मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी त्यांचे पार्थिव रुग्णालयातून त्यांच्या प्रभुकुंज या निवासस्थानी आणण्यात आले होते. याठिकाणी पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. शिवाजी पार्क येथे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह दिग्गजांनी श्रद्धाजली वाहिली.

या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, क्रिकेटपट्टू सचिन तेंडुलकर, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, सिनेअभिनेता शाहरुख खान, अमिर खान यांच्यासह लाखो चाहते शिवाजी पार्कवर आपल्या लाडल्या दीदीला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

मध्य प्रदेशातील इंदूर शहरात लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक होते. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या भावंडांमध्ये लतादीदी आपल्या आईवडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. लतादीदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली.

1942मध्ये लतादीदी 13 वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडीलांचे हृदयविकाराने निधन झाले. तेव्हा मंगेशकरांचे एक जवळचे नातेवाईक आणि नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी लतादीदींच्या कुटूंबियांची काळजी घेतली. त्यांनी लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.

Lata Mangeshkar
गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन

लतादीदींनी गायलेली गाणी

अनेक ख्यातनाम संगीतकारांची, सुमारे 1800 हून अधिक चित्रपटांतील विविध प्रकारची २२ भाषांतील गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांची संख्या सुमारे 25 ते 30 हजारांच्या घरात सहज जाते. लता दीदींचा सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ’जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ म्हणून त्यांचा उल्लेख आहे.

Lata Mangeshkar
ठाकरे कुटुंबाशी लतादीदींचा खास स्नेह होता...

-लता दीदींना मिळालेले पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार (1958, 1962, 1965, 1969, 1993 आणि 1994)

राष्ट्रीय पुरस्कार (1972, 1975 आणि 1990)

महाराष्ट्र शासन पुरस्कार (1966 आणि 1967)

1969 - पद्मभूषण

1974 - जगातील सर्वाधिक गाण्यांचा गिनीज बुक रेकॉर्ड

1989 - दादासाहेब फाळके पुरस्कार

1993 - फिल्मफेअर लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड

1996 - स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार

1997 - राजीव गांधी पुरस्कार

1999 - NTR बक्षीस

1999 - पद्मविभूषण

1999 - झी सिनेचा जीवनगौरव पुरस्कार

2000 - I.I.A. एफ. चे जीवनगौरव पुरस्कार

2001 - स्टारडस्ट जीवनगौरव पुरस्कार

2001 - भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार "भारतरत्न"

2001 - नूरजहाँ पुरस्कार

2001 - महाराष्ट्र भूषण

लतादीदींची थोडक्यात माहिती

- वडील दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक होते.

- 1942 मध्ये आलेल्या 'किती हसाल' या मराठी चित्रपटात लतादीदींना पहिल्यांदा मराठी गाणे गायले.

- लता मंगेशकर यांना महल या चित्रपटातून सर्वात मोठा ब्रेक मिळाला. त्यांनी गायलेले "आयेगा आने वाला" सुपरडूपर हिट ठरले.

- लता मंगेशकर यांनी आतापर्यंत 20 हून अधिक भाषांमध्ये 30000 हून अधिक गाणी गायली आहेत.

- लता मंगेशकर यांनी 1980 पासून चित्रपटांमध्ये गाणे कमी केले आणि स्टेज शोवर अधिक लक्ष केंद्रित केले.

- लता या एकमेव जिवंत व्यक्ती आहेत ज्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात.

- लता मंगेशकर यांनी आनंद घनच्या बॅनरखाली चित्रपटांची निर्मिती आणि संगीतही केले आहे.

- लतादीदी नेहमी अनवाणी पायाने गाणे गायच्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com