

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दहादिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत त्यामध्ये बनावट आधार कार्ड कसे बनवले जातात आणि त्याचा बनावट मतदार नोंदणीसाठी कसा वापर केला जातो? याचा लाईव्ह डेमो दिला होता. याच आधार कार्डबाबत आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधारबाबत चौकशीतून काय समोर आलं हे सांगितलं आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "काही लोकांना रोज खोटे कागदपत्र दाखवण्याची सवय जडली आहे. आजच त्यांनी दाखवलेलं पॅनकार्ड हे खोटं निघालं, आता ते माफी मागणार आहेत का? त्यांनी याची जाहीर माफी मागितली पाहिजे. हे पॅनकार्ड नेमकं काढलं कोणी यावरुन आता गुन्हा दाखल होत आहे. खोटे कागदपत्रं आपल्याच घरी तयार करायचे आणि पत्रकार परिषद घ्यायची. त्यानंतर मीडियानं ती दिवसभर चालवतात आणि आम्हाला प्रश्न विचारतात. पण मीडियानं अशी कागदपत्रे समोर आणणाऱ्यांना प्रतिप्रश्न विचारायला पाहिजेत. तसंच त्यांच्यावर काय कारवाई करायची? त्यांना माफी मागायला लावा. खोटी कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी ते माफी मागणार आहेत का?" अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीसांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
बोगस आधार कार्ड बनवून बोगस मतदार कसे तयार केले जातात? याचं प्रात्यक्षिक रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन दाखवलं होतं. यामध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड एका वेबसाईटवर माहिती भरुन तयार केलं होतं. यासाठी केवळ एक पासपोर्ट साईजचा फोटो, आधार क्रमांक म्हणून कुठलाही १२ अंकी क्रमांक आणि मोबाईल क्रमांक इतक्याचं गोष्टींची यासाठी आवश्यकता असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं होतं.
त्यांनी प्रात्यक्षिक दाखवताना म्हटलं की, १ ते १२ पर्यंत कुठलेही क्रमांक आधार कार्ड बनवणाऱ्या एका वेबसाईटवर बनावट आधार क्रमांक म्हणून टाका. त्यानंतर नावच्या चौकटीत डोनाल्ड ट्रम्प तात्या असं नावं आणि त्यांचा इंटरनेटवरुन डाऊनलोड केलेला फोटो अपलोड करा, घर क्रं. (कुठलाही टाका) त्यानंतर ही डेटा भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिथेच प्रिंट असा ऑप्शन येईल, त्यानंतर त्यावर क्लिक केल्यानंतर हे आधारकार्ड डाऊनलोड होईल. हे आधार कार्ड हुबेहूब जुन्या आधारकार्डप्रमाणे दिसतं. फक्त या आधार क्रमांकावर आधार क्रमांक दिसत नाही. अर्थात हे बनावट आधार कार्ड असलं तरी ते हुबेहुब खऱ्यासारखं दिसत असल्यानं त्याचा वापर करुन बनावट मतदार नोंदणी केली जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. अशा प्रकारच्या अनेक वेबसाईट आहेत जिथं आधार कार्ड बनवता येतं असंही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.