MLA Raju Patil : मशीद पाडण्याची राजू पाटलांची मागणी देसाईंनी केली मान्य; आनंद दिघेंनी बंद पाडले होते काम...

Shambhuraj Desai : मशिदीच्या अर्धवट कामाचे ऑडिट करण्याचे आदेश...
Shambhuraj Desai, Raju Patil
Shambhuraj Desai, Raju PatilSarkarnama
Published on
Updated on

भाग्यश्री प्रधान आचार्य

Dombivali News : मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी अनेक वेळा मशिदीतील भोंग्याच्या आवाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर आता कल्याण ग्रामीण विधानसभेचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी जुन्या मशिदीचे ऑडिट करून ती पाडून टाकण्याची मागणी पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे केली आहे. देसाई यांनीही ही मागणी मान्य करत लगेचच कारवाईचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा वाद होणार की प्रश्न निकाली निघणार, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ज्वलंत विषयाला हात घातल्याने मनसे (MNS) देखील सक्रिय होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे-रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आशिया खंडातील सगळ्यात मोठी इराणी मशीद बांधण्याचे काम 1993 मध्ये सुरू झाले होते. विशेष म्हणजे ही मशीद उभी राहण्यासाठी अनेक ठिकाणाहून आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात झाली होती. 250 एकर जागेत ही मशीद उभी राहणार होती. मात्र त्यावेळी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या प्रचंड विरोधानंतर 1995 मध्ये या मशिदीचे काम थांबवले गेले.

Shambhuraj Desai, Raju Patil
NCP News: 'जशास तसं उत्तर' कसं द्यायचं यासाठी अजित पवार गट सज्ज !

दोन गटाच्या वादात शिवसेनेचे आंदोलन मात्र मनसेचा पाठपुरावा सुरू...

त्यांनतर कित्येक वर्ष या वास्तूचे बांधकाम अर्धवट असल्याने ती जीर्ण झाली आहे. मध्यंतरी मोठ्या बसेस भरून तेथे लोकं गेल्याचा आरोप झाला होता. त्यावरून शिवसेनेने (Shiv Sena) मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर पक्षात फूट पडली आणि या मशिदीचा मुद्दाही मागे पडला. याचाच फायदा घेत येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी उचलला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्वलंत विषयावर ठेवले बोट...

या जीर्ण वास्तूत कोणतेही अनुचित प्रकार घडू शकतात. त्यामुळे या मशिदीचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि ही मशीद पाडून टाका, अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे. या मागणीला पालकमंत्री देसाई (Shambhuraj Desai) यांनी देखील तात्काळ मान्यता दिली. एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आमदारांनी पुन्हा एकदा ज्वलंत विषयाला हात घातल्याने मनसे देखील सक्रिय होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

(Edited By - Rajanand More)

Shambhuraj Desai, Raju Patil
Nagar Political : पाथर्डी नगरपालिका इमारतीच्या सुशोभिकरणाचे काम नियमबाह्य ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com