Ashish Shelar News : उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले असल्याची टीका भाजपकडून केली जाते. हिंदुत्वावरून डिवचणाऱ्या भाजपला ठाकरेंनी ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या निमित्ताने सणसणीत चपराख दिली आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आज (सोमवारी) 'मातोश्री'वर ठाकरे कुटुंबीयांचा पाहुणचार स्वीकारला. तसेच मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंची फसवणूक झाल्याचे म्हणत अप्रत्यक्ष भाजपला टोला लगावला. यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शंकराचार्यांच्या विधानावर टिपण्णी करण्या येवढी आपली लायकी नाही, असे अशिष शेलार म्हणाले. आणि उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडल्याचा टोला लगावला.
शेलार म्हणाले की, ठराविक मतांचे लांगूनचालन करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले. याबाबात महाराष्ट्र आणि मुंबईत स्पष्टता आहे. शेलार यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्या अग्रलेखाचा देखील समाचार घेतला. 'उद्योगांना महाराष्ट्रातून पळवून लावतात, त्याच पक्षाचे नेते संजय राऊत Sanjay Raut महाराष्ट्रातून उद्योग गेले म्हणून 'हग्रलेख' लिहितात?", असा टोला शेलार यांनी लगावला.
उद्धव ठाकरे uddhav Thackeray यांच्या निमंत्रणानंतर मी मातोश्रीवर आलो.सगळ्यात मोठा घात हा विश्वासघात असतो. ठाकरेंसोबत हाच विश्वासघात झालेला आहे.याबाबत अनेकांना पीडा आहे.त्यांनी माझं स्वागत केलं. जोपर्यंत ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर परत बसत नाहीत, तोपर्यंत लोकांच्या मनातील दुःखं कमी होणार नाही असं मी त्यांना सांगितलं आहे.
यावेळी त्यांनी आपण सगळे हिंदू आणि सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत.पुण्य-पापाची भावना आपल्याकडे सांगितली आहे.पण जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असतो.जनतेचा सुद्धा अपमान करण्यात आलेला आहे, जनमताचा अनादर करणे हे चुकीचे असल्याचेही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.