Swami Avimukteshwaranand News : 'ठाकरेंचा विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय...': अविमुक्तेश्वरानंदांचं मोठं विधान

Shankaracharya Avimukteshwaranand Big Statement On PM Narendra Modi : नरेंद्र मोदी माझे दुश्मन थोडी आहेत. त्यांच्या हिताबद्दलच मी बोलत असतो. त्यांच्या चांगल्यासाठीच आम्ही बोलत असतो.चूक झाली तर...
Swami Avimukteshwaranand - Uddhav Thackeray
Swami Avimukteshwaranand - Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला विरोध केल्यामुळे ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद काही महिन्यांपूर्वी चांगलेच चर्चेत आले.त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला खडे बोलही सुनावले होते.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांना समर्थन दिले होते. मात्र, हेच शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे सोमवारी सकाळी थेट मातोश्रीवर दाखल झाले. त्यांनी आता शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्याविषयी मोठं विधान केलं आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे सोमवारी(ता.15) मातोश्रीवर आले होते. शिवसेना (ठाकरे गट)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरेंसह त्यांची मंत्रघोषात पाद्यपूजाही केली.यानंतर अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला असून ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय ते दु:खं जाणार नाही असं विधान केलं आहे.तसंच कोणाचं हिंदुत्व खरं हे समजून घ्यावं लागेल मात्र,जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो,असेही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणानंतर मी मातोश्रीवर आलो.सगळ्यात मोठा घात हा विश्वासघात असतो. ठाकरेंसोबत हाच विश्वासघात झालेला आहे.याबाबत अनेकांना पीडा आहे.त्यांनी माझं स्वागत केलं. जोपर्यंत ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर परत बसत नाहीत, तोपर्यंत लोकांच्या मनातील दुःखं कमी होणार नाही असं मी त्यांना सांगितलं आहे.

यावेळी त्यांनी आपण सगळे हिंदू आणि सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत.पुण्य-पापाची भावना आपल्याकडे सांगितली आहे.पण जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असतो.जनतेचा सुद्धा अपमान करण्यात आलेला आहे, जनमताचा अनादर करणे हे चुकीचे असल्याचेही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

Swami Avimukteshwaranand - Uddhav Thackeray
Congress In Maharashtra : विधान परिषद काँग्रेसला भोवली, पक्षात फूट दिसली; नाराज आमदारांची इतरत्र चाचपणी...

पंतप्रधान मोदींबाबत काय म्हणाले..?

ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही भाष्य केले. ते म्हणाले,मोदी माझ्यासमोर आले त्यांनी मला प्रणाम केला आणि आमचा नियम आहे जो कोणी प्रणाम करायला येतो त्याला आम्ही आशीर्वाद देतो .नरेंद्र मोदी (Narendra Modi) माझे दुष्मन थोडी आहेत.त्यांच्या हिताबद्दलच मी बोलत असतो.त्यांच्या चांगल्यासाठीच आम्ही बोलत असतो.चूक झाली तर आम्ही त्यांना थेट चूक झाली म्हणून सांगतो असंही अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले.

Swami Avimukteshwaranand - Uddhav Thackeray
Chhagan Bhujbal On Eknath Shinde : छगन भुजबळांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला; म्हणाले, 'आरक्षण अन् अभ्यास...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com