Sharad Pawar NCP Symbol : मोठी बातमी ! शरद पवार गट 'तुतारी' घेऊन उतरणार रणांगणात

Tutari Symbol to Sharad Pawar : निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार नाव कायम; आता चिन्ह मतदारांपर्यंत पोहचवण्याचे आव्हान
Sharad Pawar, Man Blowing Turha
Sharad Pawar, Man Blowing TurhaSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट तुतारी घेऊन रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत दिलेल्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने गुरुवारी रात्री कार्यवाही करून शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह बहाल केले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार हा पक्ष आगामी निवडणुकीत तुतारी फुंकणार आहे. (Sharad Pawar NCP Symbol)

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मूळ पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचा निर्णय दिला. यावर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सु्प्रीम कोर्टात धाव घेतली. या प्रकरणी सोमवारी सुनावणी पार पडली. त्यावेळी कोर्टाने निवडणूक आयोगाला आठवड्यात शरद पवारांच्या पक्षाला चिन्ह देण्याचे आदेश दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar, Man Blowing Turha
Jayant Patil : खळबळजनक! अजित पवार नाही तर जयंत पाटील फडणवीसांची पहिली पसंत...

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) मूळ पक्ष अजित पवारांचाच असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर शरद पवार गटाला तसेच 7 फेब्रुवारीला दुपारपर्यंत नव्या पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात अर्ज सादर करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार हे पक्षाचे नाव आणि काही चिन्हे सादर केली होती. पक्षाच्या नावाला मंजुरी मिळाली, मात्र चिन्हाला मंजुरी देण्यात आलेली नव्हती. हाच मुद्दा शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला होता. त्यावेळी न्यायालयाने आयोगाला सात दिवसांत चिन्ह देण्याचे आदेश दिले होते.

निवडणूक आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) गटाला राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार हे नाव दिले होते. मात्र तेच नाव आगामी निवडणूक होईपर्यंत काय राहावे, अशी विनंती शरद पवारांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. तसेच विनंतही करूनही आयोगाने चिन्ह दिले नाही. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिन्ह महत्त्वाचे असून ते लवकर मिळावे, अशी विनंतही करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने पुढील आदेश देईपर्यंत पक्षाने नाव कायम ठेवावे. तसेच चिन्हावर आठवड्यात कार्यवाही करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.

Sharad Pawar, Man Blowing Turha
Raj Thackeray News : राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; लोकसभेसाठी कल्याण, भिवंडीची चाचपणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com