Chitra Wagh And Rupali Chakankar : '...म्हणून चित्रा वाघ, चाकणकर यांना महाराष्ट्रातून तडीपार करा!'; शरद पवार गटाच्या महिला नेत्याची मागणी

Chitra Wagh And Rupali Chakankar News : "चित्रा वाघ आणि रूपाली चाकणकर या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याचे काम करत आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गरळ ओकण्याचे काम या दोघी करत आहेत."
Rupali Chakankar, Chitra Wagh
Rupali Chakankar, Chitra Wagh Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 31 News : राज्यातील राजकारणात सध्या महिला नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर गंभीर आरोप केले.

माझ्या सुनेचा वापर करुन मला बदनाम करण्याचा आणि राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. विद्या चव्हाण यांनी आरोप केल्यानंतर चित्रा वाघ यांनीही पत्रकार परिषदेत घेत त्यांच्यावर पलटवार केला. यावेळी वाघ यांनी अनेक धक्कादायक आरोप चव्हाण यांच्यावर केले तसंच त्यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावरही गंभीर आरोप केले होते.

अशातच उरण प्रकरणावरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीही सुप्रिया सुळेंवर टीका केली. या सर्व राजकीय आरोप-प्रत्यारोपावरुन आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. 'चाकणकर आणि वाघ यांना महाराष्ट्रातून हद्दपार करा', अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. पिंपळे यांच्या या वक्तव्यामुळे आता आणखी नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.

चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि रूपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना हेमा पिंपळे म्हणाल्या, "चित्रा वाघ आणि रूपाली चाकणकर या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याचे काम करत आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गरळ ओकण्याचे काम या दोघी करत आहेत. त्यांचा आकांडतांडव पाहून त्यांना कुठली तरी सापशिडी वापरुन राजकारणात काही कमावायचं आहे,असं वाटतं. त्यामुळे, या असंस्कृत आणि असभ्य महिलांना महाराष्ट्रातून तडीपार करा. या दोघींचंही महाराष्ट्रात काम नाही. त्यांना गुजरातमध्ये पाठवा."

Rupali Chakankar, Chitra Wagh
IAS Pooja khedkar: धक्कादायक, पूजा खेडकर प्रकरणाची धग नाशिकला, तहसीलदारासह ३३ शिक्षक अडकले!

दरम्यान, विद्या चव्हाण यांच्यावर चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपावर बोलताना त्या म्हणाल्या, चव्हाण यांचा तो कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही वाघ यांच्या कुटुंबात शिरतोय का? त्यांच्या कुटुंबात शिरलो तर त्यांना पळता भुई थोडी होईल. मूठ आवळली आहे, असं त्या म्हणतात, तर मग तुमची मूठ खोला, असं आव्हान देखील पिंपळे यांनी चित्रा वाघ यांना दिलं.

Rupali Chakankar, Chitra Wagh
Sharad Pawar Politics : धनंजय मुंडे, मुश्रीफ, वळसे पाटलांच्या मतदारसंघासह 'या' 20 जागा शरद पवारांनी हेरल्या; हुकमी पत्ता काढणार?

तसंच, सुप्रियाताईंच्या मागे फिरुन चाकणकरांच्या चपला झिजल्याचंही पिंगळे यांनी म्हटलं आहे. "सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे लागले असल्याचं रुपाली चाकणकर म्हणतात, पण सुप्रियाताईंच्या मागे फिरुन फिरुन तुझ्या चपला झिजल्या, हे रुपाली विसरली", अशा शब्दात त्यांनी चित्रा वाघ आणि चाकणकर या महिला नेत्यांवर टीकास्र डागलं. त्यामुळे आता हेमा पिंपळे यांच्या टीकेला वाघ आणि चाकणकर काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com