Sharad Pawar Politics : धनंजय मुंडे, मुश्रीफ, वळसे पाटलांच्या मतदारसंघासह 'या' 20 जागा शरद पवारांनी हेरल्या; हुकमी पत्ता काढणार?

Sharad Pawar NCP News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला भरघोस यश मिळालं. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बहुतांश उमेदवार विजयी झाले. पवारांनी दहा जागांवर उमेदवार दिले आणि त्यापैकी 8 उमेदवार विजयी झाले.
 ajit pawar, Sharad Pawar
ajit pawar, Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar NCP News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला भरघोस यश मिळालं. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बहुतांश उमेदवार विजयी झाले. शरद पवारांनी (Sharad Pawar) दहा जागांवर उमेदवार दिले आणि त्यापैकी 8 उमेदवार विजयी झाले.

त्यामुळे राज्यात पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राइक रेट चांगला असल्याचं बोललं जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीमुळे आघाडीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे.

एकीकडे शरद पवारांबाबतची सहानुभूती तर दुसरीकडे अजितदादांना (Ajit Pawar) महायुतीत होणारा उघड विरोध यामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आगामी काळात शरद पवारांबरोबर जाणार की अजितदादांकडे? याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. शिवाय महायुतीत आधीच शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. अशात अजितदादांच्या वाट्याला किती जागा येणार? याबाबत देखील शंका व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे काही अजित पवार गटातील इच्छुकांनी आतापासूनच शरद पवारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. पवार देखील आपले नवनवे राजकीय डाव टाकत आहेत. अशातच आता त्यांनी अजित पवारांच्या आमदारांविरोधात तरुण चेहरे उतरवण्यासाठीची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यानुसार पवारांच्या राष्ट्रवादीकडून 20 मतदारसंघात तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 ajit pawar, Sharad Pawar
Video Uddhav Thackeray : "जायचं तर उघड जा, पण...", उद्धव ठाकरेंनी कोणाला ठणकावलं?

शरद पवार नवे चेहरे मैदानात उतरवणार

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगणार आहे. यासाठी दोन्ही बाजूच्या नेत्यांनी जोरदार सुरु केली आहे. अशातच आता अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीतील नेत्यांविरोधात शरद पवार नवे चेहरे मैदानात उतरवणार आहेत.

त्यामुळे आता अजितदादांबरोबर गेलेल्या आमदारांविरोधात शरद पवारांनी दंड थोपटल्याचं दिसत आहे. धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील आणि आदिती तटकरे अशा दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात शरद पवार नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत. यासाठी 20 मतदारसंघांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

 ajit pawar, Sharad Pawar
Kolhapur Election : कोल्हापूर जिल्ह्यात शरद पवार गट लढविणार 'या' जागा

तासगाव मतदारसंघातून दिवंगत नेते आर.आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील आणि अकोले मतदारसंघातून अमित भांगरे या तरुण चेहऱ्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने याआधीच उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता उरलेल्या मतदारसंघातही पवार अशाच चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

'या' मतदारसंघात तरुणांना संधी

त्यामुळे लोकसभेच्या निकालामुळे कॉन्फिडन्स वाढलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी तरुण चेहऱ्यांना संधी देऊन त्यांना विधानसभेत पाठविण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. त्यानुसार आा अजित पवार आमदार असलेला बारामती मतदारसंघ, धनजंय मुंडेंचा परळी मतदारसंघ, हसन मुश्रीफ यांचा कागल आणि दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव मतदारसंघ यासह अन्य 16 मतदारसंघात शरद पवार युवकांना संधी देण्याची शक्यता आहे.

यामध्ये, आमदार सुनील शेळके यांचा मतदारसंघ मावळ, अहेरी, आष्टी, दिंडोरी (इथे सध्या नरहरी झिरवळ आमदार आहेत.) गेवराई, श्रीवर्धन ( हा आमदार अदिती तटकरे यांचा मतदारसंघ आहे.) हडपसर, पुसद, अळमनेर, उदगीर, इंदापूर, अणुशक्ती नगर, सिन्नर, तुमसर, फलटण आणि वडगाव शेरी या मतदारसंघात नवीन आणि युवा चेहऱ्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com