Rashtrawadi Lok Sabha MPs: राष्ट्रवादीचे खासदार कुणाकडे? तटकरे अन् पटेल अजितदादाकडे तर शरद पवारांकडे...

Ajit Pawar News : शरद पवार आणि अजित पवारांच्या बलाबलाची संख्या समोर येत आहे.
Ajit Pawar, Sharad Pawar News
Ajit Pawar, Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pawar vs Pawar : अजित पवार याचे बंड यशस्वी झाल्याची चर्चा आहे. शरद पवार आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) बलाबलाची संख्या समोर येत आहे. अजित पवार यांच्या बैठकीला 32 आमदारांची उपस्थिती असल्याची माहिती आहे. तर शरद पवार यांच्या गटाकडे 17 आमदार हजर राहिल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अजित पवार गटाला बहुमत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे खासदार कुणाकडे आहेत, असा प्रश्न पडला आहे.

राष्ट्रवादीचे राज्यात लोकसभेचे पाच खासदार आहेत. त्यामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), शिरुरचे खासदार अमोल कोल्हे, तर सातारचे खासदार श्रीनिवास पाटील, लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल हे खासदार शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित आहेत. तर रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar News
Ajit Pawar Group News : अजितदादांचं बंड यशस्वी? दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा; शरद पवारांकडे किती आमदार...

राज्य सभेमध्ये राष्ट्रवादीचे चार खासदार आहेत. त्यामध्ये शरद पवार (Sharad Pawar), प्रफुल्ल पटेल आणि वंदना चव्हाण, फौजीया खान या आहेत. मात्र, यामध्ये प्रफुल्ल पटेल सोडले तर वंदना चव्हाण आणि फौजीया खान यांचा शरद पवार यांना पाठिंबा आहे. यामुळे राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांचे पारडे जड आहे. राष्ट्रीय पातळीवरील अनेक पदाधिकारीही शरद पवार यांच्याकडेच आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार समर्थकांच्या 9 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवारांसह शपथ घेतलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. जयंत पाटलांच्या आधीच अजित पवारांनी जयंत पाटलांसह जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करण्याबाबत याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar News
NCP Crisis News Live: अजितदादांनी फडकवला राष्ट्रवादीचा झेंडा; बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांची संख्या आली समोर.

अजित पवार याचे बंड यशस्वी झाल्याची चर्चा आहे. शरद पवार आणि अजित पवारांच्या बलाबलाची संख्या समोर येत आहे. अजित पवार यांच्या बैठकीला ३२ आमदारांची उपस्थिती असल्याची माहिती आहे. तर शरद पवार यांच्या गटाकडे 17 आमदार हजर राहिल्याचे समोर यते आहे. त्यामुळे अजित पवार गटाला बहुमत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांना पाठिंबा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com