Sanjay Raut On Sharad Pawar: पवारांची संभ्रमावस्था चिंताजनक; गुप्त भेटीच्या चर्चांवर संजय राऊतांचे मोठे विधान

Sanjay Raut News: "शरद पवार यांच्या भूमिकेवर संभ्रम फार काळ राहता कामा नये, संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut and Sharad Pawar
Sanjay Raut and Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये शनिवारी पुण्यात गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. या भेटीसंदर्भात शरद पवारांनी रविवारी खुलासा करत "अजित पवार हे माझे पुतणे असून कुटुंबातील व्यक्तीने भेटण्यात गैर काय?", अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, यावरून आता महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसने सवाल उपस्थित केले आहेत.

"शरद पवार यांच्या भूमिकेवर संभ्रम फार काळ राहता कामा नये, यावर तिन्ही पक्षांनी एकत्र बसून काही निर्णय घेणे आवश्यक आहेत", अशी सूचक प्रतिक्रिया शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Sanjay Raut and Sharad Pawar
Medha Kulkarni news : मेधा कुलकर्णींवर कारवाई करा ; आरोप-प्रत्यारोपाचे मोहोळ उठले..

मुंबईत येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला'इंडिया'आघाडीची तिसरी बैठक पार पडणार आहे. या बैठकीच्या तयारीचा आढावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी'इंडिया' आघाडीच्या बैठकीसह गुप्त भेटीच्या सुरू असलेल्या चर्चांवरही पटोले आणि ठाकरे यांच्यामध्ये गांभीर्याने चर्चा झाल्याचे राऊतांनी सांगितले.

Sanjay Raut and Sharad Pawar
Gadchiroli Congress News : सोहळे कसले करताय? समस्यांना वाचा फोडा अन् सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे बघा !

"संभ्रमावस्था चिंताजनक असून ही संभ्रमावस्था संपवायला हवी. एकत्र बसून काही निर्णय घेणे गरजेचे आहेत. शरद पवारांच्या भूमिकेवर संभ्रम जास्त काळ राहता कामा नये, यावर आमचं एकमत झाले. जास्त काळ संभ्रम राहिल्यास महाविकास आघाडीला फटका बसू शकतो. त्यामुळे आम्ही लवकरच शरद पवार यांच्याबरोबर चर्चा करू", असे राऊतांनी सांगितले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com