Medha Kulkarni news : मेधा कुलकर्णींवर कारवाई करा ; आरोप-प्रत्यारोपाचे मोहोळ उठले..

Maharashtra Politics : . मेधाताईंची नाराजी दूर करण्यासाठी गडकरींनी स्वतःहून पुढाकार घेतला.
Medha Kulkarni
Medha KulkarniSarkarnama
Published on
Updated on

Pune : चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या उद्धघाटन सोहळ्यावरून माजी आमदार मेधा कुलकर्णींनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करून नाव न घेता पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी त्यांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही केला. हा वाद मिटला असे वाटत असताना पुन्हा आरोप-प्रत्यारोपाचे मोहोळ उठले आहे. मेधा कुलकर्णी यांनी पक्षशिस्तीचा भंग केल्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

Medha Kulkarni
Sharad Pawar News : नऊ वर्षात तुम्ही काय केले ? ; मणिपूर हिंसाचारावरून मोदी सरकारवर शरद पवार भडकले...

चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्धघाटनाच्या पूर्वसंध्येला मेधा कुलकर्णी यांनी 'लेटर बॉम्ब'टाकून धमाका केला. समाज माध्यमांवर पोस्ट लिहित त्यांनी चंद्रकांतदादा आणि मोहोळ यांच्यावर निशाणा साधला. पुलाच्या उद्धघाटन कार्यक्रमाला त्यांना डावलण्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. मेधा कुलकर्णी यांनी ‘निराश’ असं ट्वीट करत उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे. पुलाच्या उद्धघाटनप्रसंगी त्या उपस्थित होत्या.

Medha Kulkarni
Thackeray Group Slams CM Eknath Shinde : अजितदादा सरकारमध्ये घुसल्याने मुख्यमंत्री शिंदेंच्या हृदयाचे ठोके वाढले...

मेधाताईंची नाराजी दूर करण्यासाठी गडकरींनी स्वतःहून पुढाकार घेतला. यानंतर त्यांनी कोथरूड येथील कुलकर्णींच्या घरी जाऊन त्याच्याशी चर्चा करून वादावर पडदा टाकला होता. त्यांना दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींची वेळ मिळवून देण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले होते. त्यामुळे वाद मिटला असे वाटत असताना पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाचे मोहोळ उठले आहे.

"माझ्यावरील कुरघोड्या, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. मला विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही नाही, पण आता दुःख मनात मावत नाही. त्यामुळे तुमच्याशी बोलावे वाटले. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पाहिली आणि खूप वाईट वाटले," असे टि्वट मेधा कुलकर्णी यांनी केले होते.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com