Sharad Pawar Live Update : 'कार्याध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेंना पक्षातून आग्रह होता, पण त्यांनीच नकार दिला!'

Sharad Pawar News : अजित पवार उपस्थित का नाही?
Sharad Pawar Live Update : Sharad Pawar Statement About Supriya Sule
Sharad Pawar Live Update : Sharad Pawar Statement About Supriya Sule Sarkarnama

Sharad Pawar Statement About Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (ता. २) राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाला राज्यभरातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. यानंतर पवारांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आश्वासनानुसार आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी कायम राहत असल्याचे जाहीर केले आहे.

Sharad Pawar Live Update : Sharad Pawar Statement About Supriya Sule
Sharad Pawar On Ajitdada : पत्रकार परिषदेला अजित पवार गैरहजर : शरद पवार म्हणाले....

दरम्यान, आज वाय बी सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषेदेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पक्षाच्या कार्याध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांची नेमणूकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर पवार म्हणाले की, खासदार सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्षपदासाठी नेमणूकसाठी पक्षातून आग्रह होता, पण सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची तयारी नव्हती, त्यांनी यासाठी नकार दर्शवला, असे पवार यांनी पत्रकार परिषेदेत स्पष्ट केले.

Sharad Pawar Live Update : Sharad Pawar Statement About Supriya Sule
Devendra Fadnavis Belgaon Rally : भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ फडणवीसांची बेळगावात भव्य रॅली; पाहा फोटो...

यावेळी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याबाबतही प्रश्न उपस्थित झाला. यावर शरद पवार म्हणाले, "अजित पवार पत्रकार परिषदेला नसले तरी आमचे बाकीचे सहकारी उपस्थित आहेत. सहसा पत्रकार परिषदेला नेतृत्वाची संपूर्ण फळी कधी बसत नाही. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आज बैठक घेतली. त्यांनी ठराव केला. त्या ठरावात मी माझा निर्णय बदलावा, असा आग्रह त्यांनी सूचित केला."

पवार पुढे म्हणाले, "पक्षाच्या समितीने केलेला ठराव तो माझ्याकडे पोहोचविण्याचे काम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि अन्य राज्यांतील सहकारी यांनी एकत्रित येऊन केले. यासंबंधीच्या भावना त्यांनी माझ्याकडे स्पष्ट केल्या आहेत. त्यामध्ये पक्षाचे संपूर्ण नेते होते. कोणी आहे किंवा कोणी नाही, अशा प्रकारचा विचार करण्याची अजिबात गरज नाही."

Sharad Pawar Live Update : Sharad Pawar Statement About Supriya Sule
Sharad Pawar On Ajitdada : पत्रकार परिषदेला अजित पवार गैरहजर : शरद पवार म्हणाले....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com