Balasaheb Thackeray Banner: 'शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही'; बॅनर लावून उद्धव ठाकरेंना कुणी डिवचले ?

INDIA - Shivsena UBT News: इंडियातील पक्षांच्या बैठकीच्या पहिल्या दिवशीच शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा
Banner in Mumbai
Banner in MumbaiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : मुंबईत गुरुवार आणि शुक्रवारी अशी दोन दिवशी भाजपविरोधी आघाडी इंडियाची बैठक होत आहे. या बैठकीच्या पहिल्या दिवशीच आज ठाकरे गटावर निशाणा साधणारे पोस्टर मुंबईत झळकले आहेत. 'मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही', अशा आशयाचा मजकूर बॅनरवर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अज्ञाताने लावलेल्या या बॅनरच्या माध्यमातून ठाकरेंच्या वर्मावर घाव घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यास ठाकरे गट कशा पद्धतीने उत्तर देणार, याकडे लक्ष आहे. (Latest Political News)

पाटणा, बेंगुळुरुनंतर मुंबईत इंडियाची (INDIA) तिसरी बैठक होत आहे. या बैठकीचे यजमानपद शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आगे. या बैठकीत देशातील विविध राज्यांचे सहा मुख्यमंत्री आणि ६३ प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पुढील रणनीतीबाबत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने लोगोचे अनावरण आणि जागावाटपासह इतर महत्वाच्या निर्णयावर चर्चा होणार आहे. शिंदे गटाने मात्र या बैठकीवरून आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. यातच लागलेल्या या बॅनरमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने येऊन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Banner in Mumbai
Amit Shah Maharashtra Tour : अमित शाह पुन्हा महाराष्ट्रात येणार ; मराठवाड्याच्या दौऱ्यावर..

मुंबईतील एका स्काय ब्रीजच्या कठड्याला हा बॅनर झळकत आहे. लाल रंगाचा फलक असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यावर 'मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही', असा मजकूर लिहून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पहिल्या दिवशीच या बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न झाल्याने वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बॅनरवर कुणाचेही नाव नाही. त्यामुळे या खोडसाळपणा कुणी केला, अशी चर्चा मात्र मुंबईत सुरू झाली आहे.

Banner in Mumbai
Shivsena On INDIA Meet 'इंडिया'च्या बैठकीचा निषेध; शिंदे गट शरद पवार, उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक

दरम्यान, शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर आणि मंत्री दीपक केसरकरांनी ठाकरेंवर निशाणा साधून 'इंडिया'तील पक्षांवर सडकून टीका केली. केसरकर म्हणाले, "सेल्युलर तुरुंगातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची पाटी काढल्यानंतर मणिशंकर अय्यरांना बाळासाहेबांनी मुंबईत पाय ठेवू दिला नव्हता. पक्ष विसर्जित करू पण काँग्रेससोबत जाणार नाही, हे बाळासाहेबांचे विचार पायदळीला तुडवले जात आहेत" असे सांगून केसरकरांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लक्ष्य केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com