Jayant Patil : विधानपरिषदेसाठी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी अन् काँग्रेसचा जयंत पाटलांना पाठिंबा, ठाकरेंचं काय?

Jayant Patil News : जयंत पाटील 27 जूनला विधानपरिषदेतून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे जयंत पाटील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
nana patole uddhav thackeray sharad pawar jayant patil
nana patole uddhav thackeray sharad pawar jayant patilsarkarnama

Maharashtra Politics : राज्यात विधानपरिषदेच्या रिक्त 11 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी 12 जुलै रोजी मतदान होणार असून त्याचदिवशी मतमोजणी केली जाणार आहे. या जागांसाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) मतांची जुळवाजुळव करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, जयंत पाटील (Jayant Patil) 27 जूनला विधानपरिषदेतून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे जयंत पाटील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

जयंत पाटील ( Jayant Patil ) यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं (शरदचंद्र पवार) पाठिंबा जाहीर केला आहे. पण, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून अद्यापही पाठिंब्याचा निर्णय घेण्यात आला नाही.

रायगड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विरुद्ध ठाकरेंचे अनंत गिते, अशी लढत झाली होती. या निवडणुकीत शेकापकडून अपेक्षित मदत झाली नाही. त्यामुळे जयंत पाटील यांना पाठिंबा देऊ नये, अशी भावना शिवसैनिकांची असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत अद्याप ठाकरे गटाकडून निर्णय जाहीर झाला नाही.

nana patole uddhav thackeray sharad pawar jayant patil
MVA CM News : राऊतांकडून मविआचा CM पदाचा चेहरा म्हणून ठाकरेंचं नाव पुढं; काँग्रेसचा 'या' दोनच शब्दांत रिप्लाय

पण, मला 'इंडिया' आघाडीचा पाठिंबा असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. "इंडिया आघाडीच्या प्रमुखांनी मला पाठिंबा दिला आहे. मी या निवडणुकीला उभे राहत नव्हतो. पण, शरद पवारांच्या आग्रहाखातर निवडणूक लढत आहे.

तीन जागा निवडून आणणं, आमचं गणित आहे. पराभव सगळीकडे झाला आहे. रायगडमध्ये आम्हाला मताधिक्य मिळालं आहे. मला महाविकास आघाडीकडून दगाफटका होणार नाही," असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

रायगडमध्ये काय झालं?

रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध अनंत गिते, अशी थेट लढत झाली. या लढतीत सुनील तटकरे यांनी 82 हजार 784 हजार मतांनी अनंत गिते यांचा पराभव केला होता. सुनील तटकरे यांना 5 लाख 8 हजार 352 मते तर, गिते यांना 4 लाख 25 हजार 568 मते पडली होती. रायगडमध्ये गितेंचा झालेला पराभव शिवसैनिकांसह ठाकरेंच्या पक्षाच्या जिव्हरी लागला आहे.

nana patole uddhav thackeray sharad pawar jayant patil
NCP MLA Meet Jayant Patil : अजित पवार गटातील आमदारांचे जयंत पाटलांशी गुफ्तगू; विधीमंडळात घेतली भेट...

कसा आहे निवडणुकीचा कार्यक्रम?

अधिसूचना : 25 जून 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 जुलै 2024

अर्जाची छाननी : 3 जुलै 2024

अर्ज मागे घेण्याची तारीख : 5 जुलै 2024

मतदानाची तारीख : 12 जुलै 2024 (सकाळी 9 ते संध्याकाळी 4)

मतमोजणी आणि निकाल : 12 जुलै 2024 (संध्याकाळी 5 वाजता)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com