Ncp News : शरद पवारांनी अजितदादांबाबत कोणती मोठी चूक केली?

Jitendra Awhad on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापले...
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Jitendra Awhad Mumbai News :

अजित पवार सांगितील तसेच शरद पवार करीत होते, हीच मोठी चूक शरद पवार यांची झाली आहे. तसेच भाषण करायला माहिती लागते. अभ्यास करावा लागतो. त्याची मांडणी लागते. तुम्ही विरोधी बाकावर येऊन भाषण करायचे. तुमचा पीए तुम्हाला भाषण लिहून देत होता. त्यातही विरोधी पक्षावर केलेली टीका तुम्ही बाजूला काढून टाकत होता. एकूणच सत्ताधाऱ्यांचा विरोधी पक्षनेता, सत्ताधाऱ्यांच्या टिपांवर चालणारे अजित पवार होते, अशी गंभीर टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात बोलताना केली.

विरोधी बाकावर असताना Ajit Pawar यांनी सत्ताधारी अडचणीत येणार नाहीत, याची व्यूव्हरचना नेहमी करत होते. मी एकदा सिडकोचे प्रकरण काढले होते. तेव्हा संपूर्ण सत्ताधारी अडचणीत येणार होते. परंतु तेव्हा अजित पवार यांनी चकार शब्दही काढला नाही. तुम्ही कशा कोणाकोणाच्या सुपारी वाजवायचे हे आम्हाला माहीत असल्याचा गौप्यस्फोटही आव्हाडांनी केला. आम्ही त्या सुपारीत सहभागी झालो नाही. म्हणून आज ताट मानाने बोलत आहोत, असेही ते म्हणाले.

Sharad Pawar, Ajit Pawar
Jitendra Awhad PC : 'हिंदी-इंग्रजी येत नाही म्हणून बाथरूममध्ये लपायचे'; आव्हाडांनी सगळंच काढलं!

'खासदारकीत पक्षाचा खरा भाई पटेलभाई ठरले'

प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीवरून त्यांना पत्रकारांनी विचारले. प्रफुल्ल पटेलांनी सांगावे, पक्षात कोणाकोणाला आमदार, खासदार व्हायचे होते. त्यातही वंशाला खासदार व्हायचे होते. म्हणून प्रफुल्ल पटेलांना पुन्हा खासदार केले. पक्षात भांडण लागले होते, अनेकांना स्वप्न पडली होती. पण खासदारकीत पक्षाचा खरा भाई पटेलभाई ठरले असल्याचेही ते म्हणाले.

'तुमच्या अंगावर साधी पोलिस केस आहे का?'

वरिष्ठांच्या घरी जन्मी आलो असतो, तर अध्यक्ष झालो असतो, असे अजित पवार म्हणाले. मात्र, तुम्हाला कोणी रोखले होते, असा सवाल उपस्थित करीत तुम्ही कोणत्या आंदोलनात, कोणत्या कार्यक्रमात सहभागी झालात. आपण सत्तेसाठी जन्माला आला आहात, आपल्या डोक्यात कायम हेच खूळ होते. रस्त्यावर आंदोलन केले का? ते आधी सांगावे, असे थेट आव्हानही त्यांनी दिले.

तुमच्या अंगावर साधी पोलिस केस आहे का? तुम्ही फक्त सत्तेचं राजकारण नेहमी करत राहिलात. तेही शरद पवारांचे नाव वापरून. तुम्ही रक्तात नव्हतात, तरी रक्ताततच होता. म्हणून तुम्ही आमदार झाला, मंत्री झालात, त्यानंतर सर्व महत्त्वाची खाती तुमच्याकडे होती. तुमची सर्व बदनामी पक्षाला हानीकारक होती. तरी ती शरद पवार यांनी पोटात घातली. ती शरद पवारांची चूक होती, असेही ते म्हणाले.

'जातीयवाद पाळणारा कोणता मंत्री असेल, तर ते अजित पवार'

ओबीसी, एसटी यांचा निधी थांबवण्याचे काम कायम अजित पवारांनी केले. जातीयवाद पाळणारा कोणता मंत्री असेल तर ते अजित पवार आहेत, असा आरोपही त्यांनी केला. तुमचे कर्तृत्व काय आहे? शरद पवार नसते तर तुम्ही कुठे असता? हे सांगावे. शरद पवार गट तुमच्या हातात असताना तुम्ही त्या पक्षाचे तुकडे-तुकडे केले. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्याबाबत कसे सुमधुर संबंध होते, आम्हाला काय माहीत नाही का?. पण उगाच शरद पवारांना डिवचू नका, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'चार वेळा उपमुख्यमंत्रिपद मिळाले ते शरद पवारांमुळे'

तुम्हाला इंग्रजी, हिंदी येत नाही. जेव्हा दिल्लीला भाषणाची वेळ येत होती, तेव्हा तुम्ही बाथरूममध्ये जात होता, असा टोला त्यांनी या वेळी लगावला. बँकेत तुम्ही केलेले लोचे आले शरद पवार यांच्यावर. चार वेळा उपमुख्यमंत्रिपद मिळाले ते शरद पवार यांच्यामुळे. किमान एवढे उपकार तर ठेवा. 35 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील एक निर्णय सांगा, त्यासाठी 48 तास देतो, असे आव्हानही जितेंद्र आव्हाडांनी दिले.

'शरद पवारांचे नावच तुम्हाला नको'

राष्ट्रवादी शरद पवार हे नाव पक्षाला मिळाल्यानंतर तुम्ही त्या नावाच्या विरोधात हे आम्हाला माहीत नाही का? शरद पवारांचे नावच तुम्हाला नको, असेही ते म्हणाले. मला तुमच्याकडून आणि शरद पवार यांच्याकडूनही काही नको. माझे स्वत:च्या बापापेक्षा शरद पवारांवर अधिक प्रेम असल्याचेही त्यांनी सांगितले. शरद पवार समर्थकांना कायम अजित पवारांनी अपमानित केले आहे, हे आम्हाला माहीत आहे. पण आम्ही कधी बोललो नाही. मला शरद पवारांनी पक्षात ठेवले. तुमच्यामुळे पक्षात आलो नाही, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

R

Sharad Pawar, Ajit Pawar
NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला हवा अल्पसंख्याकांचा 'विश्वास'; युवा मेळाव्यानंतर नजर अल्पसंख्याकांवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com