महाराष्ट्रातील सरकार धोक्यात? : शरद पवार म्हणतात 'है तैयार हम!...'

'युपी तो झाँकी हे महाराष्ट्र बाकी है' असे भाजपच्या (BJP) वतीने सांगण्यात येत आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकालात भाजपने (BJP) बाजी मारताच त्याचे परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे. माझ्यासारखा लोकशाही मानणारा व्यक्ती या निकालाचा स्वीकार करेल, या शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

'युपी तो झाँकी हे महाराष्ट्र बाकी है' असे भाजपच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्या विषयी पवार यांना विचारले असता, ते म्हणाले, महाराष्ट्र तयार आहे, असे सांगत त्यांनी भाजपला इशारा दिला. अडीच वर्षे तरी महाविकास आघाडी सरकारला धोका नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्ष पुढील काळात सामान्य जनतेसाठी आणखी काम करतील. त्यासाठी वाहून घेतील.

पंजाबमधील `आप`चा विजय हा भाजपसाठीही अनुकूल नाही. काँग्रेससाठी तर हा झटका आहे, असे म्हणत दिल्लीमध्ये गेल्या दोन निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीचे `आप`ने जे प्रशासन दिले, त्यामध्ये `आप`ला लोकांनी मान्यता दिली. पंजाब हे दिल्लीच्या जवळचे राज्य आहे. दिल्लीच्या कामचा परिणाम पंजाबमध्ये झाला, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Sharad Pawar
विधानसभा निकालादिवशीच निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय

इतर राज्यातील जनतेने भाजपला समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची (Congress) परिस्थती चांगली होती. मात्र, अंतर्गत वादामुळे काँग्रेसला फटका बसला. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वातले सरकार हटवले गेले. अमरिंदर सिंह प्रभावशाली नेते होते, असेही पवार यांनी सांगितले. काँग्रेसने त्यांना हटवल्याने त्यांनी एक वेगळा पक्ष स्थापन करत भाजपच्या सोबत निवडणूक लढली. हे पंजाबच्या लोकांना पसंत पडले नाही. कृषी कायद्यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता. त्यामुळे तेथे भाजपच्या विरोधात राग होता, असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar
Uttar Pradesh : `युपी में का बा`,चे उत्तर मिळाले, युपी मे फिरसे `बाबा`

पंजाबमध्ये लोकांनी भाजप आणि काँग्रेसला हरवले, त्यांनी सत्ता एका नव्या पक्षाच्या हातात दिली. केजरीवारल यांनी दिल्लीत आरोग्य, शिक्षणामध्ये चांगले काम केले त्यामुळे लोकांनी त्यांना पसंती दिली. तेलंगणा, केरळ, तमीळनाडू, आंध्रप्रदेश राज्यात स्थानिक पक्ष काम करत आहेत. किमान समान कार्यक्रमावर विरोधकांना एकत्र यावे लागेल. पुढील रणनीती तयार करावी लागेल, असेही पवार यांनी सांगितले. काँग्रेस अनेक दिवसापासून काम करत आहे. आशी परिस्थती राजकीय जीवनात येत असते. १९९५ मध्ये देशातील सगळ्या राज्यात काँग्रेस हरली होती. तेव्हा सगळ्यांनी सांगतिले होते काँग्रेस संपली. पुन्हा काँग्रेस सत्तेत आली, असे पवार म्हणाले. गोव्यात काँग्रेसच्या जागा असताना सुद्धा भाजप सत्तेमध्ये आली होती. त्यामुळे आजही तीच परिस्थिती निर्माण होईल, असे मला वाटते असे पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com