सातारा : 'सातारा जिल्हा बँकेतील पराभवानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी सातारा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. आपली भूमिका जाहीर केली, यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांवर टीका केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje) यांच्यामुळे माझा पराभव झाला,'' असा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी केला. 'हे त्यांचेच षडयंत्र आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले. यावर राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटलांनी सावधपणे प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ''आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. त्यांची भेट झाल्यावर मी याबाबत अधिक बोलू शकेल. शिंदेचं मत काय आहे, समजून घेईन,''
स्थानिक पातळीवरील निवडणुकीतील आघाडीबाबत जयंत पाटील म्हणाले, ''राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे. प्रत्येक पक्षाला कुणासोबत आघाडी करायची ते ठरवण्याचा अधिकार आहे. काँग्रेसनं एक भूमिका घेतली असली तरी इतर पक्ष आघाडीबाबत भूमिका घेतील,''
''जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जे राजकारण झाले ते यापुढील निवडणुकीत होऊ नये, याची काळजी घेतली जावी. जे लोक विरोधात काम करतात ते सहकार पॅनेलमध्ये कसे आणि तेच बिनविरोध झाले पण आम्ही प्रामाणिक काम करूनही ताकत असूनही पराभूत होतो यामागे पक्षातील नेत्यांचे षडयंत्र आहे,'' असे ही त्यांनी स्पष्ट केले.
एकाच दिवसात सगळे अर्ज निघाले आणि हे बिनविरोध कसे झाले हे शोधले पाहिजे, असे शिंदे म्हणाले. आमदार शिंदे म्हणाले, ''शिवेंद्रसिंहराजे विषयी पक्षाने भूमिका जाहीर करावी, मी सरळपणाने निवडणूक लढवली, कोणतीही दादागिरी केली नाही. सातारा विधानसभा लढविणार का, या प्रश्नावर मी सध्या विधान परिषदेवर आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीचे 9 आमदार कसे होतील यासाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला अभेद्य राहावा यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा,''
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.