Shashikant Shinde: "आर. आर. पाटलांसारखं काम करुन दाखवणार, वेळ पडली तर...."; प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होताच शशिकांत शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

Shashikant Shinde: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड झाली असून त्यांनी आपला पदभारही स्विकारला आहे.
Shashikant Shinde
Shashikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shashikant Shinde: आमदार शशिकात शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. जयंत पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ही जबाबदारी शिंदे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. पक्षाच्या राज्य अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानं शशिकांत शिंदे यांनी आनंद व्यक्त करत. आपली पुढील वाटचाल कशी असेल हे देखील स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण काम करणार असल्याचं त्यांनी प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.

Shashikant Shinde
Prakash Mahajan: मनसेनं डावललं! इगतपुरीच्या शिबिराला निमंत्रण नाही; प्रकाश महाजनांनी बोलून दाखवली मनातील खदखद

आर आर पाटलांसारख काम करणार

शशिकांत शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रातील अनेक प्रश्न तसंच अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न मी करेन. या काळात पक्ष संघटना वाढवत असताना ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचेलच पण परत एकदा महाराष्ट्राच्या सत्तेत आणण्यासाठी दिवसरात्र कष्ट करेन, अशी आपल्याला ग्वाही देतो. पक्षात अनेक दिग्गज नेते अध्यक्षपदासाठी पात्र असतानाही मला जी संधी मिळाली, त्या संधीचं सोन करण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करेन.

सामान्य कुटुंबातील व्यक्ती नेता कसा होतो हे आर. आर. पाटलांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तशा पद्धतीचं काम करुन सर्वसामान्य माणसाच्या, जनतेच्या प्रश्नासाठी शासनाच्या आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात या महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत त्याविरोधात आवाज तर उठवेन. वेळ पडली तर रस्त्यावर उतरुन या सरकारच्या विरोधात महाराष्ट्राच्या जनेतीच जागृती करेन अशी ग्वाही देतो"

Shashikant Shinde
Kolhapur News: राजकारणाचा गियर पडला! कोल्हापुरात भाजपचा पहिला दणका; मुश्रीफांचा गडी फोडला

राजकारणात येणाऱ्या तरुणांना सोबत घेणार

पूर्वीच्या राजकारणाची आणि आजच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. पूर्वी जनतेचे प्रश्न मांडताना विरोधक आवाज उठवायचे आणि सत्ताबदल व्हायचा पण आता आमिष दाखवून आणि यंत्रणेचा उपयोग करुन सत्ताबदल केला जातो. त्यामुळं या बदलेल्या व्यवस्थेविरोधात जनजागृती करुन पक्षानं जी जबाबदारी दिली आहे ती पार पाडताना महिन्याभरात राज्याचा दौरा करत असताना पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करेन. ज्या लोकांना राजकारणात चांगल्याप्रकारे समाजसेवा करण्याची इच्छा आहे अशा तरुणांना सोबत घेऊन, विविध समाजातील, धर्मातील लोकांना बरोबर घेऊन मी पक्ष संघटना मजबूत करेन. एक महिन्याचा दौरा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबुतीनं उभं करण्यात निश्चितपणानं यश येईल.

Shashikant Shinde
Tesla Mumbai Showroom: टेस्लानं भारतातलं पहिलं ऑफिस मुंबईतच का थाटलं? महाराष्ट्रासह देशाला काय होणार फायदे? जाणून घ्या सविस्तर

विरोधीपक्षाची स्पेस भरुन काढू

आता विरोधीपक्षाचा स्पेस महाराष्ट्रात आहे, ही स्पेस भरुन काढण्याच प्रयत्न केला तर आपोआप विरोधीपक्षाला मानणारी जी जनता असते ती कितीही टक्के असो परंतू ती स्पेस भरुन काढण्याचा प्रखरतेनं प्रयत्न जर सुरुवातीपासून केला तर यश चांगलं येईल. त्यासाठी लागणारे कष्ट हे कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना विश्वासात घेऊन निश्चितपणानं करु.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com