Prakash Mahajan: मनसेनं डावललं! इगतपुरीच्या शिबिराला निमंत्रण नाही; प्रकाश महाजनांनी बोलून दाखवली मनातील खदखद

Prakash Mahajan: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सध्या नाशिकच्या इगतपुरी इथं कार्यकर्ता शिबिर सुरु आहे. पण या शिबिरामध्ये प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, पण मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांना मात्र डावलण्यात आलं आहे.
Prakash Mahajan
Prakash MahajanSarkarnama
Published on
Updated on

Prakash Mahajan: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सध्या नाशिकच्या इगतपुरी इथं कार्यकर्ता शिबिर सुरु आहे. पण या शिबिरामध्ये प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, पण मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांना मात्र डावलण्यात आलं आहे. त्यांना या शिबिरासाठी निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. त्यामुळं आता वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. प्रकाश महाजन नाराज असल्याची चर्चा तर होतेच आहे पण आपल्याला डावलल्याच्या भावनेमुळं ते प्रचंड भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

Prakash Mahajan
Kolhapur News: राजकारणाचा गियर पडला! कोल्हापुरात भाजपचा पहिला दणका; मुश्रीफांचा गडी फोडला

एक प्रवक्ता होता...

महाजन म्हणतात, "नाशिकमध्ये शिबिर आहे पण पक्षानं घरच्या व्यक्तीला बोलावलेलं नाही, पण सगळ्या जगाला बोलावलं आहे. पण मी इतर कोणावर नाराज नाही, माझा माझ्यावरच नाराज आहे. प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला अभिमान वाटेल किंवा गर्व वाटेल असंच मी प्रवक्ता म्हणून काम केलं आहे. भविष्यात ते अभिमानानं सांगतील की प्रकाश महाजन नावाचा एक प्रवक्ता आमच्याकडं झाला. पण मी देव बदलणार नाही, पण देवानं बोलावल्याशिवाय देवळात सुद्ध जाणार नाही. आपलं भांडण नशिबाचं असतं तर तिथं माणसाची हार असतेच" एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपली खदखद व्यक्त केली.

Prakash Mahajan
Tesla Mumbai Showroom: टेस्लानं भारतातलं पहिलं ऑफिस मुंबईतच का थाटलं? महाराष्ट्रासह देशाला काय होणार फायदे? जाणून घ्या सविस्तर

दोन विधानं भोवली?

नारायण राणेंविरोधातील विधान आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरील भाष्य यामुळं प्रकाश महाजन यांच्यावर राज ठाकरे नाराज असल्याची चर्चा देखील आहे. यावर बोलताना महाजन म्हणतात, "राणेंनी माझ्यावर शाब्दिक हल्ला केला तेव्हा पक्षाच्या कोणीही नेत्यानं जाहीरपणे माझी बाजू घेतली नाही. तसंच "ठाकरे बंधू एकत्र आले नाही तर इतिहास माफ करणार नाही", हे माझं विधान कदाचित पक्षशिस्तीत नसेल पण यासाठी मी पक्षनेत्यांकडं क्षमा देखील मागितली. माझ्या परिवाराला ज्या पद्धतीच्या धमक्या, फोन येत होते, त्यामुळं माझा परिवार प्रचंड अस्वस्थ झाला होता. एकतर मी नारायण राणे यांची माफी मागणं किंवा त्याच्याविरुद्ध लढायला उभं राहणं हे दोनच पर्याय माझ्यासमोर होते. यांपैकी मी दुसरा पर्याय निवडला, माझ्या कुटुंबासाठी! पण पक्षातील कुणीही ज्येष्ठानं जाहीरपणे असं म्हटलं नाही की प्रकाश महाजनांना अशा प्रकारे धमकी देऊ नये, याचंच खूप वाईट वाटलं"

Prakash Mahajan
Nimisha Priya Execution : निमिषा प्रिया यांची फाशी टळणार? मोदी सरकारने हात वर केल्यानंतर ग्रँड मुफ्तींनी दाखविला आशेचा किरण

प्रकाश महाजन भावूक

दरम्यान, इगतपुरीच्या शिबिराला मनसेच्या एकूण ८ प्रवक्त्यांपैकी ७ प्रवक्त्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, प्रकाश महाजनांना डावलण्यात आलं आहे. यावर बोलताना महाजन सांगतात, "या प्रवक्त्यांवर पक्षामध्ये इतरही जबाबदाऱ्या आहेत पण माझ्याकडं इतर कुठलीही जबाबदारी नसल्यानं त्यांना या शिबिरासाठी निमंत्रण देण्यात आलं असावं. मी मनसेचा फक्त प्रवक्ता असल्यानं पक्षाच्या कुठल्याही धोरणात्मक बाबीत मला बोलावलं जात नाही. हे दुर्देवी क्षण आहेत माझ्याबाबतीत, यावर आता काय बोलणार? अशा शब्दांत अत्यंत भावूक होत प्रकाश महाजन यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com