शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा; एसटी कर्मचाऱ्यांना आले 'अच्छे दिन'

ST : एसटी कर्मचारी अनेक दिवसांपासून आवाज उठवत होते.
 ST, MSRTC Latest News
ST, MSRTC Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

ST employees news : शिंदे-फडणवीस सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी ३४ टक्के महागाई भत्ता जाहीर केल्याने एसटी कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, याबाबतचे पत्र देखील एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना 'अच्छे दिन' येणार आहेत. (ST, MSRTC Latest News)

 ST, MSRTC Latest News
Ncp : ठोंबरेंना राष्ट्रवादीत प्रवेश देत माझे राजकारण संपवण्याचा सतीश चव्हाणांचा कट..

एसटी कामगार संघटनांसह एसटी कर्मचारी आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी अनेक दिवसांपासून आवाज उठवत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी मोठा संपही पुकारला होता. त्यावेळी एसटीचे विलीनीकरण व्हावे, यासाठी कर्मचारी आक्रमक झाले होते. त्यावेळी विलीनीकरणासह अनेक मागण्यांपैकी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता लागू करण्याची मागणीही कर्मचाऱ्यांची होती. ती आज अखेर मान्य झाली असून शिंदे-फडणवीस सरकारने याची घोषणा केली आहे.

 ST, MSRTC Latest News
राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकाच्या यादीतून खासदार कोल्हेंचे नाव वगळले..चर्चांना उधाणं...

दरम्यान, एसटी (msrtc) कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याचा निर्णय अनेक दिवसांपासून रखडला होता. यावर निर्णय होत नव्हता. त्यामुळे एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या. पण आज कर्मचाऱ्यांच्या मागणीला यश आले आहे. आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना देखील ३४ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. याआधी एसटी कर्मचाऱ्यां २८ टक्के महागाई भत्ता मिळत होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com