Maharashtra Political Crisis : शिंदे - फडणवीस - पवार सरकारमध्ये खातेवाटपाचा तिढा कायम; आता बंगल्यांवरुन राजकारण तापणार..?

Shinde- Fadnavis - Pawar Government : अजित पवारांकडे 'देवगिरी' हा बंगला महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असल्यापासूनच आहे.
Eknath Shinde Devendra Fadnavis 
 Ajit Pawar Government
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांसह आठ आमदारांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर आता खातेवाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. याचदरम्यान, आता मंत्र्यांच्या दालन आणि बंगल्यांच्यावरून युती सरकारमधील मंत्र्यांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही मोठ्या घडामोडी सुरु आहेत. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकारणात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. दुसरीकडे शिवसेनेतही (Shivsena) वेगाने घडामोडी घडत असल्याचं दिसत आहे. सत्तेतील राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान, राष्ट्र्रवादीतील शपथ घेतलेले सर्व मंत्री हे सीनिअर असल्यानं त्यांच्या तोडीस तोड खाते मिळावेत अशी मागणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis 
 Ajit Pawar Government
NCP Crisis Vs Shivsena Crisis : एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडात काय आहे साम्य आणि वेगळेपण...?

शिंदे फडणवीस सरकारमध्ये रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन आधीच शिंदे गट नाराज आहे. तसेच सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे शिंदे गटात मोठी अस्वस्थता आहे. याचवेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरुन मोठा तिढा निर्माण झाला आहे. याचवेळी मंत्र्यांच्या बंगल्यांवरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

अजित पवारांकडे देवगिरी हा बंगला महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असल्यापासूनच आहे. विरोधी पक्षनेते झाल्यानंतरही त्यांनी हाच बंगला आपल्याकडे ठेवून घेतला आहे. त्यामुळे तोच बंगला त्यांच्याकडे कायम राहणार आहे. मात्र रामटेक बंगल्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे आग्रही राहण्याची शक्यता आहे. मंत्री असताना भुजबळ यांनी हाच बंगला नात्याने आपल्याकडे ठेवलेला आहे. त्यामुळे आताही ते हाच बंगला मागण्याची शक्यता आहे. मात्र सध्या या बंगल्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी हा बंगला सोडावा अशी मागणी भुजबळ करण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis 
 Ajit Pawar Government
Maharashtra Political Crisis: पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट? कोण कुठल्या मेळाव्याला उपस्थित होतं?

मलबार येथील आलिशान बंगल्यांच्या वाटपासंदर्भात मंत्र्यांमध्ये वादावादी होण्याची शक्यता आहे. हे बंगले अनेक वर्षांपासून आपल्या मंत्री पदाच्या कार्यकाळात काही ठराविक मंत्र्यांनी आपल्याकडेच ठेवले आहेत. त्यामुळे या बंगल्यांशी त्यांचे भावनिक नाते तयार झाले आहे. तर काहींना कामाच्या दृष्टीने हेच बंगले सोयीस्कर वाटत आहेत. त्यामुळे आताही तेच बंगले मिळवेल यासाठी हे मंत्री आग्रही राहण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील हे यापूर्वी शिवगिरी या बंगल्यात राहत होते. त्यामुळे ते देखील पुन्हा हाच बांगला मिळावा, असा आग्रह धरण्याची शक्यता आहे. सध्या या बंगल्यात कामगार मंत्री सुरेश खाडे हे राहत आहे.त्यामुळे खातेवाटपाचा प्रश्न सुटला तरी, बंगल्यांचा पेच सोडवणे हे या सरकारपुढील आव्हान राहणार आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis 
 Ajit Pawar Government
Uddhav Thackeray News : राष्ट्रवादीत फूट; उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा : 48 जागांवर तयारी करण्याच्या सूचना

खातेवाटप लांबणीवर पडण्याची शक्यता

अजित पवार(Ajit Pawar) आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर कोणत्या मंत्र्यांना कोणते खाते द्यायचे आणि कोणता बंगला द्यायचा याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र बसून घेणार असले तरी यापूर्वी मंत्री राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जुन्याच बंगल्यांसाठी आग्रही असल्याचे समजते. खाते वाटप आणि बंगले वाटप करताना मंत्र्यांची नाराजी होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा प्रयत्न असल्याने खातेवाटप लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे.

तुल्यबळ खाती मिळावीत...

मुख्यमंत्री शिंदे(Eknath Shinde) यांनी त्यांच्या पक्षाकडे असलेली दोन किरकोळ खाती नव्या मंत्र्यांसाठी सोडावीत असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना कळवले आहे. त्याबदल्यात भारतीय जनता पक्षाकडे असलेली तीन छोटी खाती नव्या मंत्र्यांसाठी सोडण्यात येतील असेही त्यांनी कळविले आहे. मात्र, यापूर्वी उपमुख्यमंत्री राहिलेले छगन भुजबळ आणि गृहमंत्री राहिलेले दिलीप वळसे- पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांसाठी तेवढीच महत्वाची खाती मिळावीत असा अजित पवार यांच्या गटाचा आग्रह आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com