Pune Zilla Parishad : शिंदे सरकारकडून 'झेडपी' ला रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा

Pune Zilla Parishad : २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेली भरती प्रक्रिया ही रद्द करण्यात आली आहे.
Pune Zilla Parishad news update
Pune Zilla Parishad news updatesarkarnama
Published on
Updated on

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध संवर्गातील ८५९ पैकी ८०१ रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेच्या पातळीवर ही भरती प्रक्रिया घेण्याचा आदेश राज्य सरकारने दिला जाणार आहे.

या पदांच्या भरतीसाठी आणि जिल्हास्तर जिल्हा निवड समितीची स्थापना केली जाणार आहे. या समितीच्या माध्यमातून आरक्षणनिहाय पदे भरली जाणार आहेत. याबाबतची जाहिरात येत्या महिनाभरात प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याआधी सन २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेली भरती प्रक्रिया ही रद्द करण्यात आली आहे.

राज्य सरकारने शुक्रवारी (ता.२१) पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यास परवानगी दिली आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्यसेवक (वेगवेगळे दोन संवर्ग), आरोग्यसेविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक आदी संवर्गातील रिक्त पदे भरली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.

या पदांच्या भरतीसाठी आणि जिल्हास्तर जिल्हा निवड समितीची स्थापना केली जाणार आहे. या समितीच्या माध्यमातून आरक्षणनिहाय पदे भरली जाणार आहेत. याबाबतची जाहिरात येत्या महिनाभरात प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Pune Zilla Parishad news update
Madhya Pradesh : दिवाळीसाठी घरी जाणारे १५ प्रवाशी ठार : बस अपघातात ३५ जण जखमी

डॉ.भगवान पवार म्हणाले, "जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विविध पदांचे वेगवेगळे १२ संवर्ग आहेत. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्यसेवक (तीन संवर्ग), आरोग्यसेविका, छायाचित्रकार, अवैद्यकीय पर्यवेक्षक, आरोग्य सहायक (पुरुष), आरोग्य सहायक (महिला) आदींचा समावेश आहे. यापैकी केवळ पाच संवर्गातील पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही पदे भरण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे,"

भरली जाणारी पदे

आरोग्यसेवक -२६२

आरोग्यसेविका -५०३

औषध निर्माता -२९

प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ०४

आरोग्य पर्यवेक्षक - ०३

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com