Thane Political News : ठाणे, कल्याण, भिवंडी या तीन मतदारसंघांतून महायुतीचे उमेदवार विजयी करणे, हा आमचा संकल्प आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना आश्वासित केले आहे की, विजय शिवतारे यांना बोलवून योग्य ती समज देतील.
यामुळे स्थानिक पातळीवर या विषयावर पडदा टाकलेला आहे. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी अजित पवारांनी आपले जीवन समर्पित केले आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.
सुप्रीम कोर्टात वकील अभिषेक मनू संघवी यांनी कुठलेतरी पोस्टर दाखविले की, शरद पवार यांचे नाव आणि फोटो आम्ही वापरतोय. मी तरी असले पोस्टर बघितलेले नाही. कारण आम्हाला प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे(Sunil Tatkare) यांच्याकडून सक्त आदेश आहेत, की पवार यांचे नाव व फोटो वापरायचे नाहीत. ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयातदेखील आपण पाहू शकता की इथेदेखील स्व. यशवंतराव चव्हाण यांचा फोटो आहे. आम्ही वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आम्ही शरद पवार यांचे नाव व फोटो वापरत नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
1991 मध्ये अजित पवार सार्वजनिक जीवनात आल्यानंतर खासदार म्हणून त्यांनी आपले राजकीय जीवन सुरू केले. त्यानंतर सातत्याने महाराष्ट्राच्या विधानसभेत बारामतीचे नेतृत्व अजित पवार यांनी केले आहे. अनेक महत्त्वपूर्ण पदे अजित पवारांनी भूषविली आहेत. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे आणि कायम घड्याळ तिथे जिंकत आलेले आहे. म्हणूनच अजित पवारांनी आवाहन केले आहे की, माझी निशाणी घड्याळ आहे आणि घड्याळाला साथ द्या.
बुधवारी आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केली. बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे हे पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडत आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तटकरे यांना आश्वासित केले आहे की, विजय शिवतारे यांना बोलवून योग्य ती समज देईन. यामुळे स्थानिक पातळीवर या विषयावर पडदा टाकलेला आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी या तीनही मतदारसंघांतून महायुतीचे उमेदवार विजयी करणे हा आमचा संकल्प आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत महाराष्ट्रातल्या 16 मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला होता. यात ठाणे, कल्याण, भिवंडीचा समावेश नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे भाजपच्या शीर्ष नेतृत्वाशी चर्चा करून लोकसभा जागावाटपाबाबत योग्य तो निर्णय घेतीलआणि राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा लढवायला मिळतील, अशी आशा प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केली.
माझी लायकी काढणाऱ्यांच्यादृष्टीने मी त्यांच्या तुलनेत खूप लहान कार्यकर्ता आहे. माझ्यावर कुठलीही महागडी गाडी ( पी.वाय. ०१ रजिस्ट्रेशनची) जबरदस्तीने बळकावली असा आरोप झालेला नाही. मी एकपत्नी, एकवचनी आहे. मी माझ्या दोन जुळ्या मुलांबरोबर माझा सुखी संसार करीत आहे. त्यामुळे माझी आणि त्यांची बरोबरीच होऊ शकत नाही, असेही परांजपे म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.