ठाकरे गटाच्या नेत्याकडून चक्क शिंदे गटातील आमदाराच्या पाठीवर कौतुकाची थाप! म्हणाले...

Eknath Shinde And Uddhav Thackeray : जर ते सूरत, गुवाहाटीला गेले नसते तर कदाचित...
Uddhav Thackeray, Cm Eknath Shinde News
Uddhav Thackeray, Cm Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात विस्तवही जात नाही. दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र,याचदरम्यान ठाकरे गटातील नेत्यानं चक्क शिंदे गटातील आमदारावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले आहेत. जे चांगलं आहे तर चांगलं बोलायला आपण पुढे मागे पहिलं नाही पाहिजे असे देखील अहिर यावेळी म्हणाले.

आमदार सचिन अहिर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. अहिर म्हणाले, बच्चू कडू यांचं मी जाहीर अभिनंदन करतो. त्यांना खोके मिळाले, नाही मिळाले हे मला माहिती नाही. मी त्यामध्ये जाऊ इच्छित नाही. पण कडू हे माझे चांगले मित्र आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर किमान त्यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय हवं अशी अनेक वर्षांची जी मागणी होती ती मंजूर करून घेतली. त्याबद्दल कडू यांचं जाहीर कौतुक करतो.

तसेच जे चांगलं आहे त्याला चांगलं बोलायला आपण पुढे मागं पहिलं नाही पाहिजे. बच्चू कडू जर सूरत, गुवाहाटीला गेले नसते तर कदाचित हा विभाग झाला नसता असं देखील अहिर यावेळी म्हणाले.

Uddhav Thackeray, Cm Eknath Shinde News
Chandrakant Patil : कर्मवीरांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना 'रयत'नेही सुनावलं

... अखेर कडू यांच्या लढ्याला यश!

एकनाथ शिंदे आणि 40 समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. तसेच आमदारांसोबत ते गुवाहाटीपासून सत्तास्थापनेपर्यंतसोबत राहिले होते. मात्र, यानंतर खोकेवाले खोकेवाले म्हणून विरोधकांकडून टीका देखील केली गेली. याचवरुन मध्यंतरी अपक्ष आमदार रवि राणा आणि कडू यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. हा वाद थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचला होता. त्यांच्यावर कायमच टीका केली जाते. पण आता परंतु कडू यांच्या अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला यश आले असून शिंदे फडणवीस सरकारने दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Uddhav Thackeray, Cm Eknath Shinde News
Delhi Mayor Election : बहुमत 'आप' ला, पण महापौर भाजपचा ? ; काय आहे निवडणूक प्रक्रिया..

आता फिरतायेत सगळीकडे..; ठाकरेंनी लगावला होता कडूंना खोचक टोला

उध्दव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी बुलढाण्यातील चिखली येथील शेतकरी मेळाव्यात आमदार बच्चू कडू यांच्या जखमेवर मीठ चोळलं होतं. यावेळी त्यांनी तुमच्या विदर्भातलेच एक नेते ज्यांना आपण आपल्या मंत्रिमंडळात मंत्री केलं होतं. पण त्यांना ते पचलं नाही. समोर ताट वाढलेलं होतं. पण ते पचवता आलं नाही. आता फिरतायेत सगळीकडे म्हणाले होते. तसेच कडूच आता आम्ही लग्नात गेलो तरी लोक खोकेवाले आले म्हणतात असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com