Yamini Jadhav : मुस्लिम महिलांना बुरखा का वाटला? शिंदें गटाच्या आमदाराने सांगितले 'हे' कारण

Yamini Jadhav Shivsena burkha distribution : नेमका काय कार्यक्रम झाला, याची मला कल्पना नाही. पण बुरखा वाटपासारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.
Shivsena MLA Yamini Jadhav Burqa distribution
Shivsena MLA Yamini Jadhav Burqa distributionSarkarnama
Published on
Updated on

Yamini Jadhav News : लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेल्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना नुकतेच बुरखा वाटप केले. शिंदे गटात असणाऱ्या यामिनी जाधव यांच्या बुरखा वाटपावर भाजपने देखील टीका केली. तर, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील यामिनी जाधव यांच्यावर निशाणा साधला.

या टीकेच्या नंतर बुरखा वाटप का केले? याचे कारण यामिनी जाधव यांनी सांगून टाकले आहे. आम्ही मुस्लिम महिलांच्या सन्मानासाठी बुरखा वाटप केले, तर मग त्यात इतकं वावगं वाटण्यासारखं काय आहे? असे यामिनी जाधव म्हणाल्या.

आमदार आशिष शेलार यांनी यावर नाराजीच्या सूरात प्रतिक्रिया देत, शिवसेना शिंदे गटाला फटकारलं. 'नेमका काय कार्यक्रम झाला, याची मला कल्पना नाही. पण बुरखा वाटपासारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाही', अशा शब्दात आमदार शेलारांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या या कार्यक्रमाला फटकारलं.

Shivsena MLA Yamini Jadhav Burqa distribution
Supriya Sule On Dharmarao Atram : 'स्त्रीभ्रूण हत्येसारखी एका वडिलांची भाषा'; सुप्रिया सुळेंनी मंत्री आत्रामांना फटकारलं

यामिनी जाधव यांनी सांगितले, आपल्या दिवाळीची सणाला गिफ्ट देत असतो. आम्ही बहिणांना गिफ्ट देत असतो. मात्र मुस्लिम महिलांना काहीच देत नाही. त्यातून ही संकल्पना वर्षभरापूर्वी आली. कारण मुस्लिम धर्मातील महिलांना जास्तीत जास्त काय प्रिय असतं तर बुरखा. तो त्यांचा सन्मान असतो. त्या दृष्टीकोनातून हे वाटप मी केलं आहे.

भाजपने फटकारले

शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी बुराखा वाटपाच्या कार्यक्रमावार मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, नेमका काय कार्यक्रम झाला, याची मला कल्पना नाही. पण बुरखा वाटपासारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत.

सुषमा अंधारेंची टीका

'एकनाथ शिंदे म्हणत होते मुस्लिमांचे लांगूलचालन करणार नाही. आम्ही एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारतो यामिनी जाधव या कुणाच्या लांगूनचालन करण्यासाठी बुरखा वाटप करत आहेत. मुस्लिम मतांसाठी लांगूलचालन करत आहात का?', असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.

Shivsena MLA Yamini Jadhav Burqa distribution
Mamata Banerjee : ममतादीदींचे 'हे' रूप 13 वर्षांत पहिल्यांदाच पाहिले; कधीच नव्हती अशी भाषा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com